महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शाळांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास कारवाईचा इशारा

10:40 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जि. पं. सीईओंची शाळांना अचानक भेट

Advertisement

बेळगाव : जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी आणि शाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळांमधील शौचालयांची पाहणी करून स्वच्छता राखण्याची सूचना मुख्याध्यापकांना केली. तसेच शाळांच्या स्वच्छतेकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. शहरातील डीडीपीआय कार्यालयाच्या सभागृहामध्ये शुक्रवारी बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकास आढावा जाणून घेतला. शहर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या व्याप्तीतील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची आवश्यकता असून याची यादी तयार करण्याची सूचना त्यांनी केली. प्रत्येक शाळेला वीज संपर्क आवश्यक आहे. वीज संपर्क नसलेल्या शाळांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी. शाळांमधील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचची पाहणी करून अतिरिक्त बेंच इतर शाळांना हस्तांतरित करावेत. बीआरसीकडून याची अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी केली.

Advertisement

 दहावी परीक्षेची पूर्वतयारी करा

दहावीच्या परीक्षेची पूर्वतयारी करावी. अभ्यासामध्ये संथ असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विशेष क्लास घेण्यात यावेत. अशा विद्यार्थ्यांवर लक्ष्य केंद्रित करून निकालाचा टक्का वाढवावा, असा आदेश त्यांनी केला. यावेळी पदवीपूर्व उपनिर्देशक कांबळे, बेळगाव आणि चिकोडी शिक्षण खात्याचे उपनिर्देशक मोहनकुमार हंचाटे, डीडीपीआय अभिवृद्धी एस. डी. आदी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article