For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावधान! सोलापुरात रस्त्यावर तेल सांडल्याने मोठी दुर्घटना,7 जण जखमी.!

03:40 PM Feb 24, 2026 IST | NEETA POTDAR
सावधान  सोलापुरात रस्त्यावर तेल सांडल्याने मोठी दुर्घटना 7 जण जखमी
Advertisement

                            रात्री विजापूर रोडवर ऑईल मळल्याने दुचाकी अपघात;

Advertisement

सोलापूर : रस्त्यावर ऑईल सांडल्याने पाच दुचाकी घसरल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजता नियोजन भवनासमोर घडली. या ठिकाणी पडल्याने एक वृद्ध दुचाकीचालक गंभीर, तर अन्य सहाजण जखमी झाले.या अपघाताची माहिती कळताच सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली.

रात्री अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यावरील ऑइल पाण्याने धुण्याचे काम सुरू केले. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या वृद्धाला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये नेले. तोपर्यंत हा मार्ग बंद करून एकाच मार्गातून रहदारी सुरू करण्यात आली होती. दरम्यान ऑईल नेमके कोणत्या गाडीतून सांडले किंवा कुणी मुद्दामहून ते रस्त्यावर टाकून दिले का, याचा पोलिस शोध घेत आहेत. विजापूर रोड हा रात्री उशीरापर्यंत वर्दळीचा असतो रस्ता रुंद असल्याने वाहनंही भरधाव वेगाने जात असतात. दुचाकी वेगात असतानाच त्या घसरून पडल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.