कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रॉक गार्डनसाठी स्वखर्चाने वीजपुरवठा सुरू करू

11:41 AM Oct 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा इशारा

Advertisement

मालवण/प्रतिनिधी
मालवण राॅक गार्डन येथे वीजपुरवठा खंडित असल्याने पर्यटक आणि स्थानिक व्यापारी यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार सूचना करूनही कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने आज एका दिवसात जर वीज पुरवठा सुरळीत करण्यात न आल्यास आपण आपल्या सहकाऱ्यांसह स्वखर्चाने वीज पुरवठा सुरळीत करू असा इशारा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.वीज मीटर खराब झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती उपलब्ध झालेली असून सदरचा वीज मीटर जर वीज वितरण कडून नगरपालिका खरेदी करू शकत नसेल तर आपण आपले सहकारी गणेश कुशे, विजय केनवडेकर, मोहन वराडकर यांच्यासोबत सदरचा वीज मिटर खरेदी करून रॉक गार्डन या ठिकाणी बसवू असा इशारा श्री. आचरेकर यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update# konkan update# marathi news# malvan # rock garden malvan #
Next Article