For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्यथा वेंगुर्ले आगाराची एकही बस मळेवाडमधून जाऊ देणार नाही

03:40 PM Sep 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
अन्यथा वेंगुर्ले आगाराची एकही बस मळेवाडमधून जाऊ देणार नाही
Advertisement

उपसरपंच हेमंत मराठे यांचा इशारा

Advertisement

न्हावेली / वार्ताहर

वेंगुर्ले आगारातून सुटणाऱ्या वेंगुर्ले ,सातार्डा बस फेरी अनागोंदी नियोजनामुळे बंद असून सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना फटका बसला असल्याने पुन्हा एकदा वेंगुर्ले आगारातील कारभार हा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे ही बस तात्काळ पूर्ववत करा अन्यथा वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी वेंगुर्ले आगाराला दिला आहे.त्यामुळे वेंगुर्ला आगारातील बस फेऱ्यांचे नियोजन पुन्हा एकदा वादाचा व चर्चेचा विषय ठरला आहे. वेंगुर्ले आगार नेहमीच या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते . मग ते बस फेऱ्यांमुळे असो किंवा तेथील कर्मचाऱ्यांमधील वादावादी असो. वेंगुर्ला आगार हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. वेंगुर्ले आगारातून वेंगुर्ला, शिरोडा मार्गे सातार्डा जाणारी बस ही वस्तीची बस असून ही बस शालेय मुले, नोकरदार, व्यावसायिक व कॉलेज विद्यार्थ्यांकरिता सकाळी सातार्डा येथून वेंगुर्लेकडे जात असताना सातार्डा ,साटेली ,कोंडुरे ,मळेवाड ,आजगाव या ठिकाणच्या प्रवाशांसाठी सोयीची ठरते. मात्र वेंगुर्ला आगारातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी नियोजनामुळे ही बस फेरी गेले दोन दिवस बंद आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार ,व्यावसायिक ,शालेय मुले यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. ही बस तात्काळ पूर्ववत करा अन्यथा वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी वेंगुर्ले आगाराला दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.