For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तर माती अन् खडी नगरपरिषदेच्या दारात आणून ओतू !

12:25 PM Jan 16, 2026 IST | अनुजा कुडतरकर
तर माती अन् खडी नगरपरिषदेच्या दारात आणून ओतू
Advertisement

नगरसेवक देव्या सूर्याजी यांचा इशारा

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनचे काम पुर्ण होऊन १० दिवस झाले तरी रस्ता डांबरीकरण काम पुर्णत्वास आलेलं नसल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. न.प. बांधकाम विभागाचे अधिकारी टेंडर प्रोसेसच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांच काही पडलेलं नाही. आजच्या दिवसात डांबरीकरण झाले नाही तर माती अन् खडी नगरपरिषदेच्या दारात आणून ओतू असा इशारा नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी दिला आहे .ते म्हणाले, नागरिकांना गढूळ पाणी येत असल्याने पाण्याची नवी लाईन बाजारपेठ रस्त्यावर होती. मात्र, काम पूर्णत्वास येऊन १० दिवस झाले तरी रस्ता दुरुस्तीचे काम अद्याप झालेले नाही. रस्ता खणल्यानंतर तात्काळ दुरूस्ती केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते . मात्र, नगरपरिषद बांधकाम विभागाचे अधिकारी मस्तावले आहेत. लक्ष वेधूनही त्यांचं लक्ष नाही. भर बाजारपेठेतील दुरावस्था त्यांना दिसत नाही. मुख्य बाजारपेठेत तात्काळ डांबरीकरण करणे अपेक्षित असताना अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे येथील व्यापारी व नागरिकांना धूळीचा त्रास सहन करावा लागत आहे. व्यापारी वर्गाचा माल खराब होत आहे. न.प.चे बांधकाम अधिकारी टेंडर प्रोसेसच्या कामात व्यस्त आहेत. त्यांना सामान्यांच्या प्रश्नाच पडलेलं नाही. त्यामुळे जर व्यापारी वर्गाच नुकसान झालं, नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात झाला तर त्याला सर्वस्वी न.प.बांधकाम विभाग जबाबदार राहील. तसेच आजच्या दिवसात मुख्य बाजारपेठीतल रस्त्याचे काम न झाल्यास येथील माती आणि दगड नगरपरिषदेच्या दारात टाकून आंदोलन करू असा इशारा नगरसेवक श्री. सुर्याजींना दिला. यावेळी बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने होणाऱ्या त्रासासह झालेल्या नुकसानीची व्यथा त्यांच्यासमोर मांडली.

Advertisement

Advertisement
Tags :

.