तर वीज वितरण कार्यालयावर धडक देणार
चौके पंचक्रोशीतील चिरेखाण व्यावसायिकांचा इशारा
चौके/वार्ताहर
गेले तीन दिवस होऊन गेले तरी खंडीत झालेला चौके पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा चालू करण्यास वीज वितरणच्या अधिकारी वर्गाला यश आलेले नाही.विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे चौके पंचक्रोशीतील चिरेखाण व्यवसाय पुर्णपणे ठप्प झालेला आहे.जर विद्युत पुरवठा चालू न झाल्यास वीज वितरण कार्यालयावरती धडक देण्याचा इशारा चौके गावातील चिरेखाण व्यवसायिकांनी दिला आहे.गेले तीन दिवस चिरे वाहतूक करणारी शेकडो वाहने चौके पंचक्रोशीमध्ये येऊन राहिलेली आहेत.व्यवसाय बंद राहिल्यामुळे परवानासाठी दिलेल्या मुदतीमधील तीन दिवस वाया गेलेले आहेत.या बाबत अधिकारी वर्गाला वारंवार कल्पना देऊनही यांची काहीच दखल घेतली जात नाही.विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे . मालवण तालुक्यातील काही अर्थकारण चिरेखाण व्यवसायावरती अवलंबून आहे.नोकरी मिळत नाही म्हणून असंख्य युवक कर्ज घेऊन या व्यवसायाकडे वळलेला आहे.मात्र वारंवार खंडित होणार्या विजेमुळे हा व्यवसाय बंद करावा लागतो कि काय असा प्रश्न निर्माण झालेला.गेले तीन दिवस खंडीत झालेल्या विजेचा फटका बांधकाम व्यावसायिकांना देखील बसत आहे . चिरे मिळत नसल्यामुळे घराची व विहिरीची कामे अर्धवट राहिलेली आहेत.आता पाऊस चालू झाल्यामुळे हि कामे अर्धवट ठेवावी लागणार आहेत.तसेच बर्याचशेतकऱ्यांची घरकुल योजनेची कामे चालू आहेत.ती कामेसुद्धा अर्थवट स्थितीत राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चिरे वाहतूक करण्यासाठी असंख्य वाहने गेले तीन दिवस विद्युत पूरवठा खंडीत असल्यामुळे चौके मुक्कामी येऊन थांबलेली आहेत.कित्येक बांधकामे थांबलेली आहेत.या चिरेखाण व्यवसायावरती अवलंबून असणार्या मजूरांवरती उपासमारीची वेळ आली आहे.कित्येक परिवार दिवसभर काम करून मिळणार्या मजुरीवरती रोज आपले कुटुंब चालवित असतात.मात्र गेले तीन दिवस व्यवसाय बंद असल्यामुळे या मजूरांना त्रास सहन करावा लागत आहे.