कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

परप्पन कारागृहात कैद्यांना मोबाईल पुरविणाऱ्या वॉर्डनला अटक

10:52 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : परप्पन अग्रहार कारागृहात 20 हजार ऊपयांना मोबाईल फोन विकण्यासाठी गेलेल्या कारागृह कर्मचाऱ्याला पकडण्यात आले. कैद्यांना मोबाईल फोन पुरवणारा कारागृह वॉर्डन अमर प्रांजे (वय 29) याला परप्पन अग्रहार पोलिसांनी अटक केली आहे. तो मोबाईल फोन विकताना पकडला गेला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा कारागृहातील कर्मचारीच कारागृहात बेकायदेशीर कारवायांना मदत करत असल्याचे आणि प्रोत्साहन देत असल्याचे समोर आले आहे. 23 ऑक्टोबर रोजी अमर प्रांजे कामावर हजर झाला होता. यावेळी केएसआयएसएफ कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर त्याची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अमरने तपासणी करण्यास नकार देत परत जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला पकडून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ स्मार्टफोन आणि इअरफोन सापडल्यानंतर याची माहिती तात्काळ वरिष्ठ कारागृह अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच पोलिसांनी त्याला मोबाईल फोनसह अटक केली आहे. कारागृह अधीक्षक एच. ए. परमेश यांच्या तक्रारीवरून परप्पन अग्रहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article