For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवशक्ती कामत गल्लीकडे वार्ड चषक

10:55 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवशक्ती कामत गल्लीकडे वार्ड चषक
Advertisement

बेळगाव : शिवशक्ती युवक मंडळ, भगवा रक्षक कामत गल्ली आयोजित वार्ड क्रमांक 3 मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत शिवशक्ती स्पोर्ट्स कामत गल्ली संघाने हनुमान तालिम मेणसे गल्लीचा पराभव करुन उपविजेतेपद पटकाविले. प्रदीप गौडर सामनावीर तर ओमला मालिकावीराने गौरविण्यात आले. कामत गल्ली येथे वार्ड मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत वार्डातील 11 संघांनी भाग घेतला होता.अंतिम सामन्यात शिवशक्ती स्पोर्ट्स कामत गल्लीने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी बाद 52 धावा केल्या. त्यानंतर हनुमान तालिम संघाने 10 षटकांत 7 गडी बाद 42 धावा केल्या. हा सामना शिवशक्ती स्पोर्ट्सने 10 धावांनी जिंकला.

Advertisement

बक्षीस वितरण प्रसंगी महादेव मुचंडी, प्रफुल्ल टपालवाले, रमेश कळसण्णावर, विशाल ताशिलदार, चिंतामणी घसरी, विजयसिंग रजपूत, महादेव वेंगुर्लेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. सामनावीर प्रदीप गौडर, उत्कृष्ट फलंदाज सुमित, उत्कृष्ट गोलंदाज अकीब, मालिकावीर ओम यांना चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बसवराज गणाचारी, विश्वनाथ लोहार, नागेश पवार, किशोर रजपूत, यल्लारी बिडीकर, इरफान बाळेकुंद्री आदींनी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Tags :

.