For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कल्याण ज्वेलर्समधील 8.4 टक्के हिस्सा वॉरबर्ग पिंकसने विकला

06:01 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
कल्याण ज्वेलर्समधील 8 4 टक्के हिस्सा वॉरबर्ग पिंकसने विकला
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

खासगी इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकसने गुरुवारी कल्याण ज्वेलर्स इंडियामधील 8.4 टक्के हिस्सा 2,937 कोटी रुपयांना खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे विकला. यूएस स्थित वॉरबर्ग पिंकसने त्यांच्या शाखा हायडल इन्वेस्टमेंट एलटीडी वर एनएसई आणि बीएसईवर कल्याण ज्वेलर्स इंडियाचे शेअर्स विकले. कल्याण ज्वेलर्स इंडिया हिरे आणि दागिने उत्पादन आणि विक्रीच्या व्यवसायात आहे.

शेअर बाजारावरील उपलब्ध आकडेवारीनुसार, हायडल इन्व्हेस्टमेंटने बीएसईवर 1.80 कोटी शेअर्स विकले. त्याचप्रमाणे हायडल इन्व्हेस्टमेंटनेही एनएसईवर तीन टप्प्यांत 6.87 कोटी शेअर्स विकले. कल्याण ज्वेलर्स इंडियामधील सुमारे 8.67 कोटी समभागांची 8.42 टक्के हिस्सेदारी विकली गेली. या व्यवहारानंतर, कल्याण ज्वेलर्समधील हायडल इन्व्हेस्टमेंटचा हिस्सा 17.59 टक्क्यांवरून (डिसेंबर तिमाहीपर्यंत) 9.17 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.