For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारणेतील साहित्य संमेलनात मुलाखत, कथाकथन उत्साहात

01:52 PM Dec 09, 2024 IST | Pooja Marathe
वारणेतील साहित्य संमेलनात मुलाखत  कथाकथन उत्साहात
Warana Sahitya Sammelan Celebrates Stories and Interviews
Advertisement
साहित्यिकांना पुरस्काराचे वितरण, साहित्यिक, दर्दी रसिकांची गर्दी
कोल्हापूर
येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 29 व्या विभागीय साहित्य संमेलनात रविवारी दुसऱ्या दिवशी साहित्यिक मुलाखत, कथाकथन, पाच साहित्यिकांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्याबद्दल गौरवण्यात आले. साहित्य क्षेत्रातील रसिकांच्या प्रतिसादाने हे संमेलन पार पडले.
सकाळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. कृष्णात खोत यांची परखड मुलाखत झाली. दुपारच्या परिसंवादामध्ये लेखन चळवळीतील युवकांचा सहभाग या विषयावर डॉ. प्रीती शिंदे, डॉ. सुरज चौगुले आणि डॉ. जी. पी. माळी यांनी मनोगत व्यक्त केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे होते. ज्येष्ठ कथाकथनकार आप्पासाहेब खोत, अरविंद मानकर, संपतराव चव्हाण, अनिल शिनगारे, जयवंत आवटे यांचे कथाकथन पार पडले.
स्व. तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कार गुहागरचे डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘काळमेकर लाईव्ह’ या कादंबरीला देण्यात आला. स्व. सावित्री अक्का कोरे काव्य पुरस्कार, सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव शिंदे यांना त्यांच्या अंतस्थ हुंकार या काव्यसंग्रहाला देण्यात आला. स्व. विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार हलकर्णी चंदगडचे प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या ‘परिघाच्या रेषेवर’ या संकीर्ण साहित्याला देण्यात आला. स्व. मामासाहेब गुळवणी बालसाहित्य पुरस्कार पुण्याच्या शिवाजी चाळक यांच्या ‘अंगत पंगत’ या बालसाहित्याला देण्यात आला. तसेच शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कार सांगली जिह्यातील खंडोबाच्या वाडीचे महादेव माने यांच्या ‘वसप’या कथा साहित्याला देण्यात आला. सायंकाळच्या सत्रात वारणा बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एन. शिंदे, वारणा सत्कार्य मंडळाचे विश्वस्त के. एम. वाले, वारणा बझारचे व्यवस्थापक शरद महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे केंद्रीय निमंत्रण राजन मुठाणे, प्रा. के. जी. जाधव यांच्या प्रमुख हस्ते वितरित करण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.पी. बी. बंडगर, नसीब जमादार यांनी केले.
Advertisement
Advertisement

.