For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्ध, कच्च्या तेल किमती वाढीने शेअरबाजाराचा बिघडला खेळ

06:25 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्ध  कच्च्या तेल किमती वाढीने शेअरबाजाराचा बिघडला खेळ
Advertisement

सेन्सेक्स 1312 अंकांनी कोसळला, ऑटो, बँकिंग , रियल्टी समभागांमध्ये दबाव

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

इराण इस्त्रायल युद्धाने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीसह कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ व आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर सोमवारी पाहायला मिळाला. सेन्सेक्स 1312 अंकांनी तर निफ्टी 360 अंकांनी घसरणीत होता. ऑटो, बँक, रियल्टी समभागांनी बाजारावर दबाव निर्माण केला.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक तब्बल 1312 अंकांनी कोसळत 76015 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीदेखील कमकुवत होता. सदरचा 50 समभागांचा निर्देशांक 360 अंकांनी घसरुन 23815 अंकांवर बंद झाला होता. ऑटो, बँकिंग, कंझ्युमर ड्युरेबल्स व रियल्टी यांचे समभाग घसरणीत होते. कंपन्यांची कामगिरी पाहता निफ्टी 50 त टायटन, इंटरग्लोब एव्हिएशन व स्टेट बँक इंडिया यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत होते. यासोबत टीसीएस, विप्रो, लार्सन टुब्रो, आटयीसी, आयशर मोटर्स, एशियन पेंटस्, टाटा स्टील, मारुती सुझुकी, एनटीपीसी यांचेही समभाग घसरणीत होते. दुसरीकडे तेजीत पाहता टाटा कंझ्युमर, कोल इंडिया, मॅक्स हेल्थकेअर, सनफार्मा, एचयुएल, एसबीआय लाइफ, ओएनजीसी, ग्रासिम, अदानी पोर्ट, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग होते. मिडकॅप व स्मॉलकॅप यांच्या निर्देशांकावरही दबाव दिसून आला. मिडकॅप निर्देशांक 1.05 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक 1.13 टक्के इतका घसरला होता. बँक निफ्टी दीड टक्के इतका घसरला होता.

क्षेत्रांची कामगिरी

कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक सर्वाधिक कोसळला होता. हा निर्देशांक 4 टक्के इतका घसरला होता. याशिवाय रियल्टी, पीएसयु बँक व मीडिया यांचे निर्देशांक अधिक कमकुवत होत बंद झाले. दुसरीकडे एफएमसीजी, फार्मा व हेल्थकेअर या क्षेत्रांची कामगिरी मजबूत दिसून आली व बाजाराला यांनी काहीसा आधार दिला.

जागतिक बाजारात स्थिती

जागतिक बाजारात दक्षिण कोरीयाचा कोस्पी 4.34 टक्के तेजीत होता. जपानचा निक्केई 0.47 टक्के घसरणीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.05 टक्के कमकुवत होत व्यवहार करत होता.

Advertisement
Tags :

.