For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वॉन्टेड’ रशीद नसीम युएईमध्ये अटकेत

06:53 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘वॉन्टेड’ रशीद नसीम युएईमध्ये अटकेत
Advertisement

उत्तर प्रदेशमधील आर्थिक गुंतवणूकदारांच्या : फसवणुकीशी संबंधित ईडी प्रकरणात आरोपी

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील गुंतवणूकदारांच्या कथित फसवणुकीशी संबंधित वॉन्टेड फरार आणि आर्थिक गुन्हेगार रशीद नसीमला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) अटक करण्यात आली आहे. स्थानिक एजन्सी आणि भारतीय तपास संस्थांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. नसीम हा शाईन सिटी घोटाळ्यात बराच काळ भारतातून फरार होता. त्याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपास प्रलंबित होता. अटकेच्या कारवाईनंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया देखील विचारात घेतली जात आहे. देशातील आर्थिक गुह्यांवरील कारवाईचे हे एक प्रमुख उदाहरण मानले जात आहे.

Advertisement

तपास संस्थांनी रशीद नसीमला आर्थिक गुन्हेगार घोषित करत त्याच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले होते. तो भारतातून पळून गेल्याची पुष्टी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध सुरू करण्यात आला. इंटरपोलद्वारे देखील अलर्ट जारी केल्यानंतर भारतीय एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक सुरक्षा एजन्सींनी युएईमध्ये अटकेची कारवाई केली. अधिकृत सूत्रांनी अटकेची पुष्टी केली आहे. भारत सरकार आता प्रत्यार्पण करारांतर्गत त्याला परत आणण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्याला भारतीय एजन्सींच्या स्वाधीन केले जाऊ शकते.

ईडीने रशीद नसीमविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याने गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक योजनेद्वारे लोकांकडून कोट्यावधी रुपये गोळा केल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांचे पैसे इतर खात्यांद्वारे आणि परदेशी नेटवर्कद्वारे वळवण्यात आले. यासंबंधीची माहिती उजेडात आल्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) कारवाई केली होती.

उत्तर प्रदेशातील अनेक जिह्यांतील गुंतवणूकदारांनी आपल्या ठेवी परत मिळत नसल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. रशीद नसीम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संघटित गुंतवणूक योजना चालवल्याचा आरोप आहे. सुरुवातीला परतफेडीचे आश्वासन देऊन विश्वास निर्माण केला जात होता. नंतर, मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा केल्यानंतर नेटवर्क अचानक बंद करण्यात आले. या प्रकरणाचा राज्यातील हजारो कुटुंबांवर परिणाम झाला होता. रशीद नसीमच्या अटकेमुळे आपले पैसे वसूल करण्याच्या दिशेने प्रगती होईल अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. ईडीने आधीच संबंधितांच्या काही मालमत्ता जप्त केल्या आहेत. तपास संस्था आता त्याच्या परदेशी मालमत्ता आणि बँक खात्यांची देखील चौकशी करू शकतात. प्रत्यार्पणानंतर त्याच्या चौकशीतून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.