For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वांगचूक यांना अनुभव, आम्ही का जोखीम पत्करावी?

06:22 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
वांगचूक यांना अनुभव  आम्ही का जोखीम पत्करावी
Advertisement

अभिजीत दीपके यांचे वक्तव्य 

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नीट पेपर लीकप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीकडून (सीजेपी)              दिल्लीतील जंतर-मंतर येथे निदर्शने केली जात आहेत. या निदर्शनांना समर्थन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक मागील 9 दिवसांपासून उपोषण करत आहेत. वांगचुक यांच्यासोबत काही विद्यार्थी देखील उपोषण करत आहेत. अशास्थितीत सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचूक यांना उपोषणाचा अनुभव आहे, त्यांनाच ते करू द्या असे वक्तव्य केले आहे.

Advertisement

वांगचूक यांचे वजन उपोषणामुळे सातत्याने घटत आहे. परंतु चार दिवसांमध्येच फॉलोअर्सप्रकरणी भाजप अन् काँग्रेसला मागे टाकणारे अभिजीत दीपके यांना मैदानात अपेक्षेनुसार गर्दी जमविता आली नसल्याची चर्चा आहे. काही समर्थक आणि विद्यार्थ्यांसोबत निदर्शने करणाऱ्या दीपके यांचे वक्तव्य आता सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही लढाई दीर्घ चालणार असल्याने सोनम वांगचुक वगळता उर्वरित सदस्यांनी उपोषण करू नये, त्यांनी तंदुरुस्त राहण्याची गरज असल्याचे वक्तव्य दीपके यांनी केले आहे.

वांगचुक यांना उपोषणाचा अनुभव आहे, ते स्वत:ला सांभाळू शकतात. तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरून मला टेन्शन येत आहे. वांगचूक यांच्या उपोषणावेळी ज्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, त्यासाठी आम्हाला रहावे लागेल. सर्व जण उपोषणाला बसले तर ही निदर्शने कोण सांभाळणार असे उद्गार दीपके यांनी काढले आहेत.

एक दिवसाच्या उपोषणाचे आवाहन

जंतर-मंतरवर जमणारे लोक ‘पोट भरून खात’ असल्याबद्दल सोनम वांगचुक यांनी काही दिवसांपूर्वी दु:ख व्यक्त केले होते. कमीतकमी दिवसभर तरी खाऊ नका, जे लोक अधिक खातील ते स्थुल होत आजारी पडतील आणि उपोषण करणाऱ्या लोकांपूर्वीच मरून जतील अशा शब्दांत वांगचुक यांनी हताशा व्यक्त केली होती.

Advertisement
Tags :

.