पाचगाव परिसरात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती
पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
पाचगाव प्रतिनिधी
पाचगाव परिसरात आणि ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागलेल्या मोठया गळतीमुळे पाणीपुरवठा ठप्प असून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. परिसरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा तालुका उपप्रमुख विवेक काटकर यांनी दिला आहे
पाचगाव परिसरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे पाचगाव परिसरातील अनेक उपनगरांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. पाचगाव ग्रामपंचायतने ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत असा आरोप करात ग्रामपंचायत ने पाणीटंचाई असणाऱ्या भागात ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी शिवसेना तालुका उपप्रमुख विवेक काटकर यांनी केली आहे. ग्रामस्थांना तात्काळ मुबलक पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येणार असल्याचे विवेक काटकर यांनी सांगितले. पाचगाव परिसरात वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.