राज-डीकेच्या वेबसीरिजमध्ये वामिका गब्बी
आदित्य रॉय-समांथासोबत झळकणार
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर हा लवकरच राज आणि डीके या प्रसिद्ध जोडीच्या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये अनेक अभिनेत्री स्वत:च्या अभिनयाची जादू दाखविणार असल्याचे समजते. यात मुख्य भूमिकेसाठी समांथा रुथ प्रभूची निवड करण्यात आली आहे. तर आता या सीरिजमध्ये गुणवान अभिनेत्री वामिका गब्बीची वर्णी लागल्याचे समजते. या सीरिजचे तात्पुरते नाव ‘रक्तबीज’ ठेवण्यात आले आहे. राज आणि डीके केवळ शो रनर असतील आणि याचे दिग्दर्शन ‘तुम्बाड’ फेम राही अनिल बर्वे करणार असल्याचे सांगण्यात आले. राहीने एक रहस्यमय काल्पनिक जग या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याची तयारी केली आहे. आदित्य, समांथा आणि वामिकाला या सीरिजची कहाणी पसंत पडली आहे. ही सीरिज प्रेक्षकांना विश्वासघात, दुटप्पीपणा, प्रेम, त्याग आणि दैवाने भरलेल्या जगात नेणार आहे. ही सीरिज अॅक्शनने नटलेली असेल, याचमुळे आदित्य आणि समांथा ऊथ प्रभूने यासाठी स्वत:ची तयारी सुरू केली आहे.