वॉल्ट डिस्ने टाटा प्लेमधील 29 टक्के हिस्सा विकणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) टाटा समूहाच्या टीव्ही आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा प्रदाता ‘टाटा प्ले’मधील 29.8 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स वॉल्ट डिस्नेकडून हा हिस्सा खरेदी करणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत ही माहिती समोर येते आहे. अहवालानुसार, हा करार अद्याप चर्चेच्या टप्प्यात आहे. जर हा करार यशस्वी झाला तर अंबानी आणि टाटा समूहातील हा पहिला सहकार्याचा करार असेल, असे म्हटले जात आहे. टाटा सन्सचा टाटा प्लेमध्ये 50.2 टक्के आणि डिस्नेचा 29.8 टक्के हिस्सा आहे. उर्वरित समभाग सिंगापूरच्या टेमासेककडे आहेत. रिलायन्स टाटा प्लेच्या ग्राहकांना जिओ सिनेमा सामग्री प्रदान करणार आहे. या करारामुळे जिओ सिनेमाला टाटा प्लेच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. अहवालानुसार, रिलायन्स आपल्या जिओ सिनेमाची सर्व सामग्री टाटा प्लेच्या ग्राहकांना ऑफर करेल. डिस्ने आपयपीओमध्ये शेअर्स ऑफर करणार होते. याआधी डिस्ने कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये आपला हिस्सा देणार होती, परंतु टाटा प्लेची लिस्टिंग पुढे ढकलल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
टेमासेकला 20 टक्के हिस्सा विकायचा होता
एक वर्षापूर्वी, टाटा प्लेचे तिसरे भागधारक टेमासेक यांनी देखील कंपनीतील 20 टक्के हिस्सा विकण्यासाठी टाटा समूहाशी चर्चा केली होती. या कराराची किंमत 1 अब्ज डॉलर (सुमारे 8,301 कोटी रुपये) होती. नंतर या कराराबाबत कोणतीही ठोस कृती दिसून आली नाही. मार्केट शेअर विभाजनामुळे, कंपनीला आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत 4,499 कोटी रुपयांच्या महसुलावर सुमारे 105 कोटी रुपयांचा तोटा झाला. तर, एका वर्षापूर्वी कंपनीला 4,741 कोटी रुपयांच्या महसुलावर 68.60 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा करार जाहीर होणे अपेक्षित आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार, डिस्ने आणि रिलायन्सचा या करारात 40 टक्के आणि 51 टक्के हिस्सा असेल. तर बोधी ट्रीचा टीव्ही नेटवर्क आणि ओटीटी व्यवसायात 9 टक्के हिस्सा असेल. बोधी ट्री हा मीडिया उद्योगातील दिग्गज जेम्स मर्डोक आणि डिस्ने इंडियाचे माजी प्रमुख उदय शंकर यांचा संयुक्त उपक्रम आहे.