पायी चालणे सर्वात उत्तम वर्कआउट
दीर्घ चालण्याने वाढते आयुष्य
पायी चालणे एक उत्तम व्यायाम आहे. वेग न वाढवता याद्वारे वर्कआउटची तीव्रता वाढविण्याचे देखील सरल मार्ग आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ नेवादामधील न्यूट्रीशन्स सायन्सच्या प्राध्यापिका जॅनेट ड्यूफेक यांच्यानुसार मंदगतीने, निरंतर चालणे हृदयविकाराचे रुग्ण अन् मधुमेहग्रस्तांसाठी लाभदायक आहे. तर दीर्घ चालणे कर्करोग अन् अकाली मृत्यूचा धोका कमी करत असते. वॉकची तीव्रता वाढून अधिक लाभ मिळविले जाऊ शकतात. स्लो एएफ रन क्लबचे संस्थापक मार्टिनस इवान्स यांच्यानुसार वॉक आनंददायी असायला हवा, आपण अॅथलीट नव्हे.
एक्सरसाइज करणे आवश्यक
पायी चालण्यात मोठ्या स्नायूंचे समूह सामील असतात, यात ग्लूट्स आणि क्वाड्स सामील आहे. दोन्ही शरीराच्या खालील भागातील स्नायू आहेत. परंतु कुठल्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत पायी चालण्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही प्रकारची हालचाल नसल्यास तो याच्यासोबत अशी एक्सरसाइज जोडू शकतो, ज्यामुळे शरीराच्या वरील भागाचीही हालचाल होऊ शकेल. हातात पाण्याची बाटली घेऊन चालू शकतो, तसेच हात वरच्या दिशेने घेत किंवा गोल फिरवून एक्सरसाइज करता येतो असे इवान्स यांचे सांगणे आहे. तर डॉ. ड्यूफेक यांनी हातांमध्ये वजन घेत बॉक्सिंगप्रमाणे हवेत ठोसा लगावण्याचा सल्ला देतात. हिंडताना कुठेही थांबून स्क्वॉटस करणे उत्तम ठरणार आहे.
मैत्रिपूर्ण शर्यत
जर तुम्ही कुणा मित्रासोबत हिंडत असाल तर मैत्रिपूर्ण शर्यतीमुळे याला मजेशीर स्वरुप प्राप्त करता येते. घड्याळात वेळ न पाहता ठराविक लक्ष्य निर्धारित करत चालण्याची सवय लावून घ्यावी असे तज्ञांकडून सुचविण्यात आले.