जलद चालल्यास हृदयाचे ठोके होणार नियंत्रित
13 वर्षांपर्यंत 4,20,000 लोकांवर झाले अध्ययन
वेगाने चालल्याने हृदयाच्या अनियमित ठोक्यांना सामान्य होण्यास मदत मिळेत. याला चिकित्सीय भाषेत एट्रियल फिब्रिलेशन म्हटले जाते. यात हृदयाच्या ठोक्यांचा वेग असामान्य स्वरुपात तीव्र होतो किंवा अत्याधिक कमी होत असतो. परंतु नव्या संशोधनातून वेगाने चालल्याने केवळ ही समस्या नियंत्रित होते असे नाही तर याची जोखीम 46 टक्क्यांपर्यंत घटविण्यास देखील सहाय्यकभूत ठरते.
ग्लासगो विद्यापीठाच्या संशोधकांचे हे अध्ययन जर्नल हार्टमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अध्ययनात ब्रिटनच्या युके बायोबँकच्या 4 लाख 20 हजारांहून अधिक लोकांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. यात सहभागी लोकांनी स्वत:च्या चालण्याचा वेग मंद, सरासरी आणि अधिक असल्याचे सांगितले होते. वेगाने चालणाऱ्या लोकांमध्ये हृदय गति असामान्यतेचा (एट्रियल फिब्रिलेशन) धोका 46 टक्क्यांपर्यंत कमी आढळून आला. अशाचप्रकारे सरासरी वेगाने चालणाऱ्यांमध्ये ही जोखीम 35 टक्क्यांपर्यंत कमी आढळून आली. तर मंदगतीने चालणाऱ्या लोकांमध्ये ही जोखीम अपेक्षेच्या तुलनेत कमी राहिली. 13 वर्षांच्या या अध्ययनादरम्यान एकूण 36,574 लोकांमध्ये हृदय गतीच्या विविध समस्या विकसित झाल्या, ज्यात वेंट्रिकुलर अतालता, अत्याधिक मंद ठोके आणि अन्य हृदय संबंधी प्रणालीच्या समस्या सामील होत्या.
वेगाने चालणे उपयुक्त
वेगाने चालल्याने शरीरात चयापचय दर चांगला असतो आणि सूजसंबंधी घटक कमी होतात, जे हृदयाच्या हालचालींवर सकारात्मक प्रभाव पाडतात. याच्या अतिरिक्त हे स्थुलत्व कमी करते, जे हृदय विकाराचे प्रमुख कारण आहे. शरीरात इंफ्लेमेशन घटवून हृदयाच्या पेशींना स्वस्थ ठेवते. यामुळे रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन वितरण चांगले होते, यामुळे हृदयावर ताण कमी पडतो.
निष्क्रीय लोकांमध्ये जोखीम अधिक
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जे लोक निष्क्रीय राहतात, त्यांच्यात सक्रीय व्यक्तींच्या तुलनेत मृत्यूची जोखीम 20-30 टक्के अधिक असते. याचमुळे पायी चालणे एक सुलभ, स्वस्त आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ प्राध्यापक मॅकीज बानाच यांच्यानुसार 10 हजार पावले चालणे आदर्श मानले जात असले तरीही दररोज केवळ 4 हजार पावले चालणे देखील आरोग्यासाठी पुरेसे आहे.
जितकी मोठी पावले, तितका लाभ अधिक
एका अन्य संशोधनात 1 हजार पावले चालल्याने मृत्यूची जोखीम 15 टक्क्यांपर्यंत घटत असल्याचे दिसून आले. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये 6 हजार ते 10 हजार पावले प्रतिदिन चालल्याने मृत्यू जोखिमीत 42 टक्क्यांची घट दिसून आली आहे.