निरोगी आरोग्यासाठी चालताय तर हाताची मुव्हमेंट जरूर करा
कोल्हापूर
दररोज चालणे हा निरोगी आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे. चालताना तुमचे हात आणि खांदे यांचा योग्य वापर केलात तर तुमचे शरीर संतुलित राहण्यासाठी मदत होते. चालताना हाताची मूठ बांधणे, बोटांच्या .... टॅपस् चा वापर करणे यानेही व्यायामाचा प्रभावी परिणाम दिसतो.
दररोज चालणे हे तुमच्या उत्तमा आरोग्यासाठी अतिशय सोप्पा आणि परिणामकारी प्रकार आहे. चालताना दोन्ही हाताच्या मुठी करून हातांची हालचाल केल्याने फक्त आपल्या शरीराची ठेवणचं सुधारते असे नाही तर तुमचा मूडही सकारात्मक ठेवते.
चालताना तुमच्या पायांना योग्य ऊर्जा मिळते आणि त्यांचा व्यायामही होतो. पण याचवेळी जर तुम्ही तुमच्या हातांचा वापर केला तर आरोग्य जास्त कार्यक्षम होते, तर तुमच्या शरीराचा बॅलेन्स उत्तमरित्या सावरला जातो. जर तुम्ही चालताना उजव्या पायासोबत डाव्या हाताची हालचाल केली आणि डाव्या पायासोबत उजव्या हाताची हालचाल केली तर तुम्हाला चालाताना अजून उर्जादायी वाटेल. पण या उलट अनैसर्गिकरित्या म्हणजे डाव्यापाया सोबत डावा हात आणि उजव्यासोबत उजवा हात हालवला तर हेच चालणे कंटाळवाणे होऊन जाईल.
चालताना पायांसोबत हातांची हालचाल तर कराच, पण या सोबत हाताची मूठ करून उघड झाक करणे, हाताच्या बोटांच्या अंगठ्याने उर्वरित बोटांना दाबून सोडून देणे, मनगटाचे व्यायाम, अंगठ्याचे व्यायामही करावे.
दररोज चालण्यामुळे आरोग्याचे होणारे फायदे खालीलप्रमाणेः
1. हृदयाचे आरोग्य सुधारते:
नियमित चालल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
2. वजन कमी करण्यास मदत:
चालणे हे कॅलरीज जाळण्याचा एक चांगला मार्ग आहे, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पचन सुधारून चयापचय वाढतो.
3. मधुमेह नियंत्रण:
चालण्यामुळे शरीरातील इंसुलिनची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
4. मानसिक आरोग्यास फायदेशीर:
चालणे हे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते. चालल्याने मेंदूतून एंडॉर्फिनसारखी आनंददायक रसायने स्रवतात, ज्यामुळे मूड सुधारतो.
5. हाडे व सांधे मजबूत होतात:
चालल्यामुळे हाडांची घनता टिकून राहते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
सांधे लवचिक राहतात आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
6. प्रतिकारशक्ती वाढते:
नियमित चालल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दी-पडसे यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
7. झोप सुधारते:
दररोज चालल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि निद्रानाशाचा त्रासही कमी होतो.
8. दीर्घायुष्य वाढते:
चालण्यामुळे एकंदर दीर्घायुष्य वाढते आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीस प्रोत्साहन मिळते.
9. पचन सुधारते:
चालल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.
10. ताणमुक्त जीवनशैली:
चालताना निसर्गाशी जोडल्यामुळे मन प्रसन्न होते आणि एकाग्रता वाढते.
डॉक्टरांकडून अनेक रुग्णांना दररोज किमान ३० मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि जीवनशैली अधिक सक्रिय होते.