कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उपनगरात केएमटीची प्रतीक्षाच

01:41 PM Jul 03, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी :

Advertisement

चालक, वाहकांची रखडलेली नियुक्ती, आवश्यकतेपेक्षा अपुऱ्या असणाऱ्या बसेस, चालक, वाहकांची कमतरता, ब्रेक डाऊनमुळे थांबलेल्या बसेस आदी कारणामुळे केएमटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा अधिक परिणाम उपनगरातील बहुतांश भागात केएमटीच्या फेऱ्या कमी होण्यावर झाला आहे. उपनगरात विद्यार्थी, महिला व कामगारवर्गाला केएमटीची तासंतास वाट पहावी लागत आहे. केएमटी वेळेत येत नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

Advertisement

केएमटीच्या चालक वाहकांची पदोन्नती वर्षानुवर्षे रखडली आहे. नवीन चालक, वाहकांची भरती झाली नसल्यामुळे मणुष्यबळ कमी पडत आहे. काहीवेळा चालक, वाहक उपलब्ध होत नसल्यामुळे बस थांबवून ठेवण्याची वेळ केएमटी प्रशासनावर येत आहे. प्रशासनाने तत्काळ पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. नवीन भरती प्रक्रियाही राबविण्याची गरज आहे.

अपुऱ्या बससेवेमुळे उपनगरातील प्रवाशांना, विशेषत: नोकरदार आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे दैनंदिन प्रवासात अडथळे येत असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बसची संख्या कमी असल्यामुळे प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त भरले जात आहेत. त्यामुळे केएमटी बसेसचा खुळखुळा होत आहे. जादा प्रवासी भरल्याने टायरची झीज होत आहे. जादा प्रवासी, त्यातच रस्त्यांवरील मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे केएमटी बसचे कमान पाटे खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे.

केएमटीच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. यासाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनचे काम केएमटीच्या वर्कशॉप जवळ सुरू आहे. अद्यापही 50 टक्के काम अपुर्ण आहे. हे काम जोपर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत नवीन बस दाखल होऊ शकत नाहीत. दिवाळीपर्यंत यातील 40 नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असल्याचे केएमटी प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. या बसेस दाखल झाल्यास फेऱ्या वाढणार असुन केएमटीच्या बसेसचे वेळापत्रक सुधारणार आहे.

सकाळी कॉलेजला जाणारे विद्यार्थी व खासगी अस्थापनाला जाणारे बहुतांश कर्मचारी केएमटीने प्रवास करतात. बरेचजण मासिक पास काढतात. त्यामुळे बस वेळेत आली नाही तर गैरसोय होते. काही प्रवाशांना खासगी वाहनांचा किंवा रिक्षांचा अवलंब करावा लागत असून, त्यांना आर्थिक फटका बसत आहे. बसच्या वेळा अनियमित झाल्याने प्रवासात मोठी अडचण निर्माण होत आहे. कामगार व विद्यार्थ्यांना केएटीचा आधार असल्याने प्रशासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

सायंकाळी शाळा, खासगी अस्थापनाची सुट्टीची वेळ असते. यावेळी विद्यार्थ्यांची गर्दी अधिक होते. त्यामूळे बस फुल्ल झालेल्या असतात. दाराला लोंबकळत प्रवास केला जातो बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे वाट पाहत बसण्यापेक्षा गर्दीतून चेंगरत गेलेले बरे असे म्हणत प्रवास करावा लागत आहे.

पूर्वी उपनगरातून शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी दर 15-20 मिनिटांनी बस उपलब्ध असायची. परंतु, आता काही मार्गांवर तासभर किंवा त्याहून अधिक वेळ वाट पाहावी लागते. त्यामुळे ऑफिसला आणि शाळांना वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे. बससेवा ही सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, पण आता ती विश्वासार्ह कमी होऊ नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रवासी संजय पाटील यांनी सांगितले.

बसच्या ताफ्यातील काही गाड्या खराब होण्यासह चालक व वाहक यांच्या अपुऱ्या संख्येमुळे सेवेवर परिणाम झाला आहे. सध्या पुरेशा बस उपलब्ध नाहीत. त्यातच दुरूस्तीसाठी काहीवेळा बसेस थांबवाव्या लागतात. त्यामुळे काहीवेळा एखाद्या रूटवर बस रद्द करावी लागते.

सकाळी कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहावी लागते. काहीवेळा बस न आल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनाही समस्येचा सामना करावा लागत असल्याचे विद्यार्थीनी सायली कांबळे हिने सांगितले.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article