जांबोटी भागात वायंगणी भात लागवडीला वेग
मुबलक पावसामुळे यावर्षी उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी भागासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी वर्गाने पाणथळ शेतवाडीमध्ये वायंगणी भात (उन्हाळी भात) लागवडीला प्रारंभ केला आहे. मागील वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे यावर्षी वायंगणी भात लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या भागात वायंगणी भात लागवडीसाठी शेतवडीमध्ये नैसर्गिक जलस्त्राsत उपलब्ध असल्यामुळे उन्हाळ्dयामध्ये शेतकरी वर्ग दरवर्षी वायंगणी भाताची लागवड करतात. यापासून शेतकरी वर्गांना दुबार भात उत्पन्न मिळते. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या प्रारंभी शेतकरी वर्ग वायंगणी भात लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरुची पेरणी पारंपारिक पद्धतीने पाण्यातच करतात. तरु पेरणीनंतर त्याची योग्यरित्या उगवण झाल्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर लागवडी योग्य बनल्यानंतर पाणतळ व दलदलीच्या शेतवडीची पारंपारिक पद्धतीने मशागत करून वायंगणी भात लागवड करण्यात येते.
फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी भात लागवडीला प्रारंभ
या भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून शेतवडीत वाहून येणारे पावसाचे पाणी तसेच पावसाळ्dयात निर्माण होणाऱ्या प्रचंड नैसर्गिक आपतीमुळे अनेक ठिकाणच्या शेतवडीत पावसाळ्यामध्ये पिके घेणे शक्य नसल्यामुळे अशा शेततडीमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये वायंगणी जातीच्या भात रोपांची लागवड करतात. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी वायंगणी भात लागवडीला प्रारंभ करण्यात येतो. वायंगणी भात पिकाच्या पोषक वाढीसाठी शेतवडीमध्ये नैसर्गिक जलस्त्राsतांची आवश्यकता असते तसेच तीन ते चार महिन्यानंतर भात पोसवल्यानंतर त्याची मळणी करतात.
वायंगणी भातामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म
वायंगणी भातामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असल्यामुळे या भाताचा आहारासाठीही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. वायंगणी भातामधून शेतकऱ्यांना दुबार उत्पन्न मिळत असले तरी गवीरेडे, रानडुकरे माकड आदी जंगली प्राण्यांकडून वायंगणी भाताची नासाडी होते. मे महिन्यात होणाऱ्या वळीव पावसामुळे देखील वायंगणी भाताची कापणी व मळणी करताना देखील शेतकरी वर्गांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
यंदा लागवडीला पोषक वातावरण
मागील वर्षी या भागात मुबलक प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नैसर्गिक जल स्त्राsतांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्यामुळे वायंगणी भात लागवडीला पोषक वातावरण असल्याने या भागात यावर्षी वायंगणी भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. निलावडे, आंबोळी, मुगवडे, कबनाळी, दारोळी, जांबोटी, ओलमणी, कापोली के. सी., चापोली, चिखले, आमगाव, आमटे तसेच नेरसा, शिरोली भागातील अनेक गावांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात वायंगणी भाताची लागवड करीत आहेत.