Ratnagiri News : डंपर दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
05:59 PM Jun 11, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
गाडी मागे घेताना अंदाज चुकल्याने घडली घटना
खेड : खेड-आंबवली मार्गावरील सुकिवलीनजीक डंपर ३५ फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात नितीन विजय पवार (२७रा. चिंचघर-दस्तुरी, खेड) या चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास गाडी मागे घेताना अंदाज चुकल्याने ही घटना घडली.
चालक नितीन पवार आपल्या ताब्यातील डंपर (एमएच०८ डब्लू ८४७१) घेऊन सुकिवली येथील खडी क्रशरवर जात होता. मृत चालक चिंचघर-दस्तुरीचा रहिवासी आहे. याचदरम्यान, डंपर मागे घेत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट दरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सूरज हंबीर यांनी घटनास्थळी पोहचून दरीत कोसळलेल्या चालकास डंपरमधून बाहेर काढून उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती त्यास मृत घोषित केले.
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अपघातात डंपरचेही नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Advertisement
Advertisement