For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाई शहरात अन्न - औषध प्रशासनाचा केवळ कागदोपत्री कारभार? अस्वच्छ खाद्यपदार्थ अन् भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

01:49 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
वाई शहरात अन्न   औषध प्रशासनाचा केवळ कागदोपत्री कारभार  अस्वच्छ खाद्यपदार्थ अन् भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Advertisement

वाई: वाई शहरात दिवसेंदिवस वाढतचाललेल्या अरवच्छ खाद्यपदार्थ विक्री, भेसळयुक्त अन्न, रस्त्यावरील हातगाड्या, चायनीज स्टॉल, मिठाई व्यवसाय आणि अवैध गुटखा विक्रीच्या प्रश्नांवर अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राज्यभर धडक कारवाया सुरू असल्याचे चित्र निर्माण केले जात असताना वाई शहरात मात्र परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

शहरातील अनेक हातगाड्या, फळ विक्रेते. चायनीज गाड्या आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवर स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव अरात्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वापरले जाणारे तेल किती जुने आहे, पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी कुठून आपले जाते. खाद्यपदार्थ बनविताना स्वच्छतेचे नियम पाळले जातात का, याची तपासणी प्रशासनाकडून नियमितपणे केली जाते का,असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः मिठाई व्यवसायाबाबतही गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत. खवा, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता तपासली जाते का? भेसळयुक्त पदार्वांचा वापर होत नाही ना? मिठाई तयार करणाऱ्या मट्टयांमध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप नागरिकांना मिळालेली नाहीत.

वाईतील अनेक हॉटेल्ला आणि लग्न कार्यालय या ठिकाणी हजार दोन हजार लोकांचा होणारा स्वयंपाक त्यामध्ये पनीर कसल्या कॉलिटीचा वापरला आहे किंवा अन्य दुग्धजन्य पदार्थ कशाप्रकारे वापरले गेले आहेत याची कधी माहिती घेतली आहे का आणि खाद्य व्यवसायांच्या स्वयंपाकगृहांची स्थिती तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने किती वेळा भेटी दिल्या. किती नमुने तपासले आणि किती जणांवर कठोर कारवाई केली, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. अनेक वर्षांनंतर झालेल्या काही मोजक्या कारवाया केवळ आकडेवारी दाखवण्यासाठीच झाल्याचा आरोप होत आहे.

Advertisement

अनेक ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू असून शालेय विद्यार्थी आणि तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे काही अवैध धंदेकरणाऱ्यांना संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याची चर्चा शहरात उघडपणे होत आहे.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंहे यांनी ज्या पद्धतीने धडक मोहीम राबवून भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, त्याच धर्तीवर वाई तालुका आणि सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :

.