For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाघवडे रस्ता संपूर्ण खड्डेमय

10:01 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाघवडे रस्ता संपूर्ण खड्डेमय
Advertisement

वाहनधारकांची कसरत : त्वरित दुरुस्तीची मागणी

Advertisement

वार्ताहर /मजगाव

मच्छे ते वाघवडे रस्ता म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. मच्छे ते वाघवडे सुमारे 4 कि. मी.चा रस्ता संपूर्ण उखडल्याने रहदारीसाठी वाहनधारकांची अक्षरश: तारेवरची कसरत चालली आहे. कधी कोणाचा बळी जाईल हे मात्र सांगता येणार नाही. वारंवार प्रशासने व लोकप्रतिनिधींकडे सदर रस्त्याची तक्रार करूनही कोणीही अद्याप या रस्त्याची दखल घेतली नाही. या रस्त्यावरून मच्छे औद्योगिक वसाहतीला जाणारे शेकडो कामगार व उद्योजक ये-जा करीत असतात. तर वाघवडे, मार्कंडेयनगर, संतिबस्तवाड आदी गावचे नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. पण सध्या पावसामध्ये ये-जा करणे म्हणजे धोका पत्करूनच जावे लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून सदर रस्त्याचे खडीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.