Kolhapur New : वाघ ओहळ पुलामुळे चिक्केवाडीकरांना दिलासा, ग्रामस्थांच्या संघर्षाला यश
चिक्केवाडी गावधी पिढ्यांपिढ्याची ही अवस्था आहे
पाटगाव : पावसाळ्यात संपर्क तुटायचा, आजारी माणूस जीव मुठीत घेऊन चालत जायचा, पण आता दिलासा मिळतोय अशी प्रतिक्रिया मुदरगड तालुक्यातील चिक्केवाडी गावकऱ्यांनी दिली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील भटवाडी-चिक्केवाडी रस्त्यावर एका महत्त्वाच्या 'वाघ जोडळ' या ओढ्यावर मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून पूल बांधून तयार झाला आहे. त्यामुळे चिक्केवाडी ग्रामस्थांच्या अनेक वर्षाच्या संघर्षाला आज पहिलं यश मिळालं आहे.
दळणवळणाच्या अभावामुळे रांगणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेले चिक्केवाडी गाव अनेक वर्ष मूलभूत गरजांपासून वंचित राहिलं, पावसाळ्यात ओढे दुबडी भरून वाहतात, पूल नसल्याने गावाचा संपर्क पूर्णपणे तुटायचा. शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.
आता ग्रामस्थांच्या सततच्या मागणीनंतर एक महत्त्वाचा निर्णय झाला असून एका मोठ्या ओढ्यावर 'वाघ ओडळ'वर पूल बांधण्यात आला आहे. व इथं पर्यंत रस्ताही झाला आहे. याच ओढ्यावरून गेल्या कित्येक वर्षांत अनेक वृद्ध, महिला व विद्यार्थ्यांना तसेच पर्यटकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागला होता.
हा पूल म्हणजे केवळ पूल नाही, तर चिक्केवाडीच्या भविष्यासाठीचा मंत्री आबिटकर यांच्यावतीने तयार करण्यात आलेला एक 'रामसेतू च म्हणावा लागेल. आता पूल झाला आहे, मंत्री आबिटकर यांनी चिक्केवाडीपर्यंत रस्त्याची सोय तेवढी करावी, अशा भावना येथील नागरीक बोलून दाखवत आहेत. या गावात सातच घरे, गाव जंगलात, सात घरात मिळून बारा माणूसच गायात, ते पण पन्नासीच्या घरात असणारी माणसे, गावच्या
एका बाजूला सलग १२ किलोमीटर जंगल आणि दुसऱ्या बाजूला रांगणा किल्ल्याचे पठार, व पाटगांव धरणाचे बॅकवॉटर भुदरगड तालुक्यात तर दुसरे टोक कोकणाला मिडलेले. गावात जे काठी लोक आहेत ते सारे पन्नाशीच्या वरचे, गावात एकही तरुण नाही, एक ही तरुणी नाही, लहान बाळ नाही. शाळा नाही.
एसटी नाही, दवाखाना नाही, एवढेच काय पावसाळ्यात चार महिने गावातील रहिवाशांना घरात कोंडून घेऊन बसण्यावाचून मार्ग नाही. एखादी मोठी घटना घडली तर संपर्क यंत्रणा तोकडी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत असतात. चिक्केवाडी गावधी पिढ्यांपिढ्याची ही अवस्था आहे.
रांगणा किल्ल्यापासून अलिकडे अवघ्या तीन ते चार किलोमीटरवर चिक्केवाडी गाय आहे. हे गाव म्हणजे मानवी वस्तीचे शेवटचे टोक येवून पुढे जी पायवाट सुरु होते ती रांगणा किल्ल्यावर जाते. व किल्ल्यावरून खाली कोकण दरवाज्याने कोकणात सावंतवाडी तालुक्यात जाऊन थांबते.
गारगोटी पाटगाव, तांब्याची वाडी, आहे, भटवाडी ते चिक्केवाडी हे अंतर साधारण ४० किलोमीटर आहे.
पाटगाव हेच या मार्गातले मोठेगाव. पुढे वरती विरळ होत जाते व दोन्ही बाजूस दाट झाडीचे जंगल सुरु होते. जंगलात बिबटे, अरवलांचा वावर आहे. एसटी भटवाडीपर्यंत जाते, तेवून चिक्केवाडी खाचखळग्याच्या रस्त्यातून दोन मोठे नाले ओलांडून खाजगी वाहनानेच जावे लागते. गावात एकडी तरुण नाही. लहान मुले नाहीत.
शाळा १२ किलोमीटरवर लांब आणि तेही चालत जायचे हे शक्यच नाही, त्यामुळे मुलांना गावात ठेवलेच जात नाही. मुलांना घेऊन त्यांचे आईबाप गावाबाहेर पडतात. बाहेर नोकरी करतात. कोल्हापुरात अनेक ठिकाणी चहागाळ्या आहेत, त्या गाहचा चिक्केवाडीच्या तरुणाच्या आहेत. इथले तरुण मुलाबाळांना घेऊन गावाबाहेर पडतात. पण रोती जनावरांमुळे वृद्ध आईबापांना गावाकडेच ठेवतात पण आता ओढ्यावर बांधण्यात आलेल्या पुलामुळे पावसळ्यात गावाकडे जाण्याचा मार्ग बोडाफार सुकर झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
रस्त्याशिवाय पूल अपूर्ण
या पुलाचा पूर्ण फायदा होण्यासाठी रस्त्याची गरज अनिवार्य आहे. पूल म्हणजे एक संधी आहे, ती जर पक्क्या रस्त्याने जोडली गेली, तर चिक्केवाडीच्या विकासाची वाटचाल झपाट्याने होईल.
"वाघ ओहळेवर झालेल्या या नूतन पूलामुळे आम्हा चिक्केवाडी गावच्या नागरीकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून आता या पुलापासून चिक्केवाडी पर्यंतचा रस्ता पण लवकरात लवकर पूर्ण करावा व आमच्या अनेक पिढ्यांचा ररत्याबाबतचा प्रश्न पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मार्गी लावावा."
- रूपेश शिंदे (ग्रामस्थ, चिक्केवाडी)