Solapur News : वाडी-विकाराबाद डाऊन रुळाखालील भरावा खचला
वाडी–विकाराबाद डाऊन मार्गावर रुळाखालील भूस्खलन
सोलापूर : भरावा दक्षिण मध्य रेल्वेच्या गुंतकल विभागातील वाडी-विकाराबाद डाऊन मार्गावर रुळाखालील (तटबंध) व रिटेनिंग वॉल घसरल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.ओएचई मास्ट क्रमांक ०२/०४ ते ०२/०६ दरम्यान गिट्टीचा भरावा घसरल्याने सकाळी ७.३० वाजल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या घटनेमुळे गाडी क्रमांक १२७०१ मुंबई-हैद्राबाद हुसेनसागर एक्प्रेस, गाडी क्रमांक १२२१९ मुंबई-हैद्राबाद दुरांतो एक्प्रेस तसेच अनेक मालगाड्यांना फटका बसला. संभाव्य धोका वेळीच लक्षात आल्यानेवाडी वाडी-विकाराबाद डाऊन रुळाखालील भरावा घसरल्याचे दिसत आहे.मोठा अनर्थ टळला. खबरदारी म्हणून सर्व संबंधित गाड्या वाडी स्थानकावर थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्याअभियांत्रिकी विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रॅक दुरुस्ती व सुरक्षिततेचे काम सुरू केले. सकाळी ९.१५ वाजता तात्पुरत्या वेगमयदिसह रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर सकाळी १०.४० वाजता ट्रॅक फिट असल्याचे सांगण्यात आले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून १० किमी प्रतितास वेगमर्यादा ठेवून 'स्टॉप डेड अँड प्रोसीह पद्धतीने गाड्या सोडण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, मुंबईहून हैदराबादला जाणारी हुसेनसागर एक्प्रेस तसेचलोकमान्य टिळक टर्मिनस हैदराबाद दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या वाडी स्थानकावर सुमारे एक ते दीड तास थांबविण्यात आल्या. याचबरोबर अनेक मालगाड्याही अडकून पडल्या. बराच वेळ गाड्या न हलल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता, पुढे ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, अचानक प्रवासात खंड पडल्याने अनेक प्रवाशांचे पुढील नियोजन कोलमडले असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असून रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.