महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलियाच्या वेड प्रथमश्रेणीतून निवृत्त् होणार

06:52 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ होबार्ट

Advertisement

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मॅथ्यू वेडने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती होणार असल्याचे जाहीर केले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने आपण लवकरच प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे वेडने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर वेड प्रथमश्रेणी क्रिकेटला निरोप देणार आहे.

Advertisement

शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया यांच्यात 21 मार्चला होणार आहे. वेडच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा लाल चेंडू वापरातील शेवटचा सामना राहिल. वेडने 2012 साली आपल्या प्रथमश्रेणी क्रिकेटला प्रारंभ केला होता. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत डावखुरा फलंदाज मॅथ्यू वेड गुजरात टायटन संघामध्ये दाखल होईल. आयपीएल स्पर्धेत वेडला पहिले किमान दोन सामने हुकतील असा अंदाज आहे. मॅथ्यू वेडने आतापर्यंत 36 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना 29.87 धावांच्या सरासरीने 1613 धावा जमविल्या असून त्यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे. मॅथ्यू वेडने शेवटची कसोटी 2021 साली ब्रिस्बेन येथे भारताविरुद्ध खेळली होती. अॅलेक्स कॅरेने ऑस्ट्रेलियन संघात आपले स्थान भक्कम केल्याने मॅथ्यू वेडला संघातील स्थान गमवावे लागले. मॅथ्यू वेडने 2021 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळविलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पाकविरुद्धच्या दुबईतील उपांत्य सामन्यात वेडने केलेली 17 चेंडूतील नाबाद 41 धावांची खेळी ही अविस्मरणीय ठरली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#sports
Next Article