For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारी एनर्जीचा समभाग तेजीवर स्वार

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
वारी एनर्जीचा समभाग तेजीवर स्वार
Advertisement

मुंबई : वारी एनर्जी यांचा समभाग गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजीत असलेला दिसून आला. कंपनीने तिसऱ्या तिमाहीमध्ये नफा आणि महसुलामध्ये दमदार कामगिरी केल्याचा परिणाम समभागावर सकारात्मक पाहायला मिळाला. कंपनीचा समभाग गुरुवारी भारतीय शेअर बाजारात एनएसईवर 13 टक्के वाढत 2740 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल मूल्य हे 76,224 कोटी रुपयांचे झाले आहे. गेल्या बारा महिन्यांमध्ये पाहता कंपनीचे समभाग 9 टक्के इतके वाढले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.