For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलएस जीआयटीकडे व्हीटीयू चषक

09:58 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलएस जीआयटीकडे व्हीटीयू चषक
Advertisement

आंतर अभियांत्रिक फुटबॉल स्पर्धा : एआयटी अंगडी उपविजेता, निखील नेसरीकर, बसवराज पाटील यांचे निर्णायक गोल

Advertisement

बेळगाव : केएलएस जीआयटी अभियांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू बेळगाव विभागीय आंतर अभियांत्रिक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएलएस जीआयटी संघाने अंगडी अभियांत्रिक महाविद्यालयाचा 2-0 असा पराभव करून व्हीटीयू चषक पटकाविला. जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरती घेण्यात आलेल्या व्हीटीयू चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन केएलएस जीआयटीच्या प्राचार्य व इतर मान्यवरांच्या हस्ते चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात जैन महाविद्यालयने एसजीबीआयटीचा 1-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात एसडीएम धारवाड जेसीएटी हुबळी संघाचा 2-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात व्हीटीयू बेळगावाने एजीएमआर वारूळचा टाय ब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव केला. पाचव्या सामन्यात केएलएस व व्हीडीआयटी हल्याळच्या अंगडी संघाने 1-0 असा निसटता पराभव केला. सहाव्या सामन्यात टीएसई गदगने लक्ष्मेश्वर संघाचा सडन डेथमध्ये 7-6 असा पराभव केला. सातव्या सामन्यात केएलएस जीआयटीने जेसीई बेळगावचा 1-0 असा पराभव केला. आठव्या सामन्यात केएलई आयटी हुबळीने एसडीएम धारवाड संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. नवव्या सामन्यात व्हीटीयू बेळगावने केएलई सीईटी चिकोडी संघाचा 3-0 असा पराभव केला. दहाव्या सामन्यात अंगडी संघाने टीसीई गदगचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएलएस जीआयटी संघाने व्हीटीयू बेळगाव संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 19 व्या मिनिटाला जीआयटीच्या निखील नेसरीकरच्या पासवर सुदर्शन चौगुलेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 44 व्या मिनिटाला बसवराज पाटीलच्या पासवर साहिल काकतीकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 48 व 50 व्या मिनिटाला व्हीटीयू संघाच्या आघाडीच्या खेळाडूंनी गोल करण्याची संधी दडवल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एआयटी अंगडी महाविद्यालयाने केएलई आयटी हुबळी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पहिल्या सत्रात गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 47 व्या मिनिटाला अंगडीच्या राजेशच्या पासवर नरेश कळ्ळीमनीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हुबळीने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. अंतिम सामन्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सतीश देशपांडे, विकास जी, विख्यात कट्टी, आकाश मंडोळकर व ओजस रेवणकर आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून करण्यात आले. 11 व्या मिनिटाला अंगडीच्या नरेश कळ्ळीमनीने गोल करण्याची सुवर्णसंधी वाया दवडली. 22 व्या मिनिटाला जीआयटीच्या सुदर्शन चौगुलेच्या पासवर निखील नेसरीकरने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला जीआयटीच्या साहील काकतीकरच्या पासवर बसवराज पाटीलने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात अंगडी संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सतीश देशपांडे, विकास जी, विख्यात कट्टी, आकाश मंडोळकर व ओजस रेवणकर यांच्या हस्ते विजेत्या केएलएस जीआयटी व उपविजेत्या एआयटी अंगडी संघाचा चषक, प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रेडेकर, अखिलेश अष्टेकर, सुदर्शन चौगुले यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.