For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हीटीयूचा दोन कंपन्यांशी करार

10:13 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हीटीयूचा दोन कंपन्यांशी करार
Advertisement

बेळगाव : जागतिक पातळीवर वेगाने बदलत चाललेल्या औद्योगिक क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान व कौशल्याचीही गरज आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रमुख विषयांमध्ये कुशल बनविण्याच्या उद्देशाने येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने अस्पायर नॉलेज आणि स्कील इंडिया प्रा. लि. या संस्थांबरोबर करार केला आहे. या करारानुसार अस्पायर नॉलेज आणि स्कील इंडिया प्रा. लि. या संस्था केंद्र सरकारच्या स्कील इंडिया उपक्रमांतर्गत नॅशनल स्कील डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशनच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयात मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणार आहेत. या करारामुळे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

Advertisement

विश्वेश्वरय्या विद्यापीठाचे कुलगुरू विद्याशंकर एस. म्हणाले, राज्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सर्वांगीण व कुशल पदवीधर बनविण्यासाठी विद्यापीठाने काही योजना सुरू केल्या आहेत. या योजनांतर्गत कॅम्पसमध्येच औद्योगिक व तांत्रिक शिक्षण एकाच व्यासपीठावर आणून इंटर्नशीप व प्रशिक्षणाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असे कौशल्य शिकविले जात आहे. यासाठी सीएनसी वर्कशॉप स्थापन करण्यात आले आहे. कोप्पळ व दांडेली येथे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांशी करार करून इंटर्नशीप दिली जात आहे. यावेळी कुलगुरू विद्याशंकर एस. यांच्या अध्यक्षतेखाली कुलसचिव प्रा. बी. ई. रंगास्वामी, अस्पायर नॉलेज अॅण्ड स्कील इंडियाचे चेअरमन डॉ. संजय गांधी यांनी करारावर स्वाक्षरी केली. सुबोध पाटील, ब्रिसा टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष जॉर्ज वर्गीस, प्रा. एस. एल. देशपांडे, व्हीटीयूचे विशेष अधिकारी प्रा. एस. के. अंबेकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.