For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरवडे आरोग्य केंद्राला वृक्षवल्ली कन्स्ट्रक्शनकडून वैद्यकीय साहित्य भेट

05:27 PM Jun 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
निरवडे आरोग्य केंद्राला वृक्षवल्ली कन्स्ट्रक्शनकडून वैद्यकीय साहित्य भेट
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वृक्षवल्ली कन्स्ट्रक्शन'चे संचालक विजय नाईक यांच्या वतीने आवश्यक साहित्याची भेट देण्यात आली. आज हे साहित्य निरवडे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा पाताडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.आरोग्य केंद्रातील रुग्णांची गरज ओळखून संजय तानावडे यांनी 'वृक्षवल्ली कन्स्ट्रक्शन'चे संचालक विजय नाईक यांच्याकडे या साहित्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना दाद देत उद्योजक विजय नाईक यांनी सामाजिक बांधिलकीतून तातडीने हे साहित्य उपलब्ध करून दिले. या साहित्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक उत्तम सेवा मिळण्यास मदत होणार असल्याने, डॉ. पूजा पाताडे यांनी विजय नाईक व संजय तानावडे यांचे विशेष आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.