For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी देशात आज मतदान

07:10 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी देशात आज मतदान
Advertisement

102 मतदारसंघात 1,625 उमेदवार रिंगणात :  16.63 कोटी मतदार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

देशातील सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी 102 संसदीय मतदारसंघ आणि 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये शुक्रवार, 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 1,625 उमेदवार (पुऊष 1,491; महिला 134) रिंगणात आहेत. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6 वाजता संपेल. अऊणाचल आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेसाठीही शुक्रवारीच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 39 जागा असून मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यासोबतच राजस्थानमधून 12, उत्तर प्रदेशातून 8, उत्तराखंडमधून 5, अऊणाचल प्रदेशमधून 2, बिहारमधून 4, छत्तीसगडमधून 1, आसाममधून 4, मध्य प्रदेशातून 6, महाराष्ट्रातून 5, मणिपूरमधून 2, मेघालयातून 2, मिझोराममधील 2, त्रिपुरातील 1, पश्चिम बंगालमधील 3, जम्मू आणि काश्मीर, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमधील एका जागेवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रथम टप्प्यात तामिळनाडू आणि उत्तराखंड या दोन राज्यातील लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.

Advertisement

निवडणूक आयोगाने या टप्प्यासाठी चोख व्यवस्था केली असून 18 लाखांहून अधिक मतदान अधिकारी नियुक्त केले आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 16.63 कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावण्यासाठी पात्र असून 1.87 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदारांमध्ये 8.4 कोटी पुऊष, 8.23 कोटी महिला आणि 11,371 तृतीय लिंगी मतदारांचा समावेश आहे. 35.67 लाख नवमतदार पहिल्यांदाच मताधिकार बजावणार असून 20 ते 29 वयोगटातील 3.51 कोटी तऊण मतदार उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवतील. यासोबतच 85 वर्षांवरील 14.14 लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी झाली असून 13.89 लाख दिव्यांग मतदार आहेत. 85 वर्षांवरील दिव्यांग मतदार आणि मतदान केंद्रावर येण्याचा निर्णय घेणाऱ्या मतदारांसाठी पिक अँड ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी 41 हेलिकॉप्टर, 84 विशेष गाड्या आणि सुमारे 1 लाख वाहने तैनात करण्यात आली आहेत. निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक निर्णायक पावले उचलली आहेत. मतदान केंद्रांवर पुरेसा केंद्रीय फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 50 टक्क्मयांहून अधिक मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाईल. सूक्ष्म निरीक्षकांच्या तैनातीसोबतच सर्व मतदान केंद्रांवर 361 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 127 जनरल पर्यवेक्षक, 67 पोलीस पर्यवेक्षक आणि 167 आर्थिक पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. 102 लोकसभा मतदारसंघात स्थानिक थीम असलेली मॉडेल मतदान केंद्रे उभारली जात आहेत. 5,000 हून अधिक मतदान केंद्रे संपूर्णपणे सुरक्षा कर्मचाऱ्यांसह महिलांद्वारे व्यवस्थापित केली जातील आणि 1000 हून अधिक मतदान केंद्रे अपंग व्यक्तीद्वारे हाताळली जाणार आहेत.

मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा

प्रत्येक मतदान केंद्र तळमजल्यावर बांधण्यात आले असून तेथे पिण्याचे पाणी, शौचालय, शेड, रॅम्प, व्हीलचेअर, हेल्प डेस्क आणि मतदारांसाठी स्वयंसेवक असतील. मतदारांना त्यांच्या निवासस्थानी मतदार माहितीच्या स्लिपही पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. तसेच उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेत मतदारांना सर्व खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. मात्र, भारतीय मतदारांचा उत्साह वाढत्या उष्म्यावर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाचे आवाहन

पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी मतदारांनी उत्साहाने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी निवडणूक आयोगाने मतदारांना केलेल्या आवाहनाच्या व्हिडिओनुसार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी भारतीय मतदारांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीत 2024 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या एका मताच्या ताकदीला कमी लेखू नका, असे सांगत राजीव कुमार यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच आपले कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मतदान करण्यास सांगा आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाला मतदान करण्यासाठी प्रेरित करा. तऊणांनी मतदानात सहभाग वाढवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये विधानसभा निवडणूक

अऊणाचल आणि सिक्कीममध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकाही एकाचवेळी होत आहेत. अरुणाचलमध्ये लोकसभेच्या 2 तर विधानसभेच्या 60 जागांवर मतदान होईल. तसेच सिक्कीममध्ये लोकसभेची एक तर विधानसभेच्या 32 जागा आहेत. या दोन्ही राज्यातील विधानसभा मतदानाचा निकाल 2 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांची मतमोजणी होईल.

Advertisement
Tags :

.