महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिझोराम, छत्तीसगडमध्ये आज मतदान

06:58 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा : मिझोराममधील 40, छत्तीसगडमधील 20 जागांसाठी मतदार बजावणार हक्क

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मिझोराममध्ये नवीन सरकार निवडण्यासाठी मंगळवार, 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मिझोराम विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. यासोबतच मंगळवारी छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 20 जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. तर, मतमोजणी 3 डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

गेल्या महिन्यात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. त्यानुसार मिझोराममधील सर्व 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. तर, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मंगळवारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 17 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी दोन्ही राज्यांमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

छत्तीसगड : नक्षलींच्या धोक्यामुळे चोख सुरक्षा

छत्तीसगडमध्ये गेल्या आठवड्यात नक्षली हल्ल्याच्या घटना वाढल्यामुळे मतदान असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेमध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि मतदान प्रक्रियेत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरक्षेची चोख अंमलबजावणी केली आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त बस्तर विभागातील 12 आणि राजनांदगाव भागातील 8 जागांवर मंगळवारी मतदान होत आहे. यापैकी फक्त 10 जागांवर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर इतर 10 जागांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 20 जागांसाठी एकूण 223 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 5,304 केंद्रांवर 40 लाख 78 हजार 681 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मिझोराममध्ये मतदारांची संख्या

मिझोरामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होत असून तेथेही चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी सर्व निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्यासह रवाना झाले आहेत. ऑगस्टमध्ये मिझोराममध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात एकूण 8,38,039 मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या 4,31,292, तर पुऊष मतदारांची संख्या 4,06,747 इतकी आहे. येथे पुऊष मतदारांपेक्षा महिला मतदार 24,545 ने जास्त आहेत. याशिवाय राज्यात 5,021 ‘सेवा मतदार’ आहेत.

मिझोराममध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर मिझो नॅशनल फ्रंट 10 वर्षानंतर सत्तेत परतला होता. 2018 मध्ये, ‘एमएनएफ’ने 40 जागांच्या मिझोरम विधानसभेत 26 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या. याशिवाय झोराम पीपल्स मुव्हमेंटने 8 जागांवर आणि भारतीय जनता पक्षाने 1 जागेवर विजय मिळवला होता. काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत निराशाजनक होती. येथे तत्कालीन मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते लाल थनहावला यांना चंपाई दक्षिण आणि सेरछिप विधानसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होता. एका ठिकाणी त्यांचा ‘एमएनएफ’ उमेदवाराकडून तर दुसऱ्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article