For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये आज मतदान

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेश  छत्तीसगडमध्ये आज मतदान
Advertisement

निवडणूक यंत्रणा सज्ज : 3 डिसेंबरला होणार मतमोजणी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, 17 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. विधानसभेच्या सर्व 230 जागांसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होईल. तसेच छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी 19 जिल्ह्यातील 70 जागांवरही शुक्रवारी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेशातील 230 जागांवर एकूण 5.6 कोटी मतदार आहेत. यामध्ये पुऊष मतदारांची संख्या 2.88 कोटी, तर महिला मतदारांची संख्या 2.72 कोटी आहे. यावेळी सर्वात खास बाब म्हणजे राज्यातील एकूण 22.36 लाख तऊण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाने 64,523 मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. येथे जीपीएस सुसज्ज वाहनांमध्ये मतदान कक्ष आणि ईव्हीएम पाठवण्यात आली. भोपाळ येथील केंद्रातून या वाहनांवर नजर ठेवण्यात येत आहे.

Advertisement

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी बुधवारी थांबली. यंदाच्या निवडणुकीत मध्यप्रदेशात अतिशय रोमांचक लढत पाहायला मिळत आहे. येथे काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. मात्र, सपा, बसपा आणि आम आदमी पक्षही येथे निवडणूक लढवत असून काही जागांवर उलथापालथ होऊ शकते. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुकीला सत्तेची सेमीफायनल असेही म्हटले जात आहे. मध्यप्रदेशात संसदेच्या 29 जागा आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या जवळ असतानाही काही काळानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा आघाडी घेतली. एकंदरीत दोन्ही पक्षांची मध्यप्रदेशात आपल्या जागा वाढवण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

छत्तीसगडमध्ये 70 जागांसाठी 958 उमेदवार रिंगणात

छत्तीसगड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 958 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील एकूण 90 विधानसभा जागांपैकी 20 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, तर उर्वरित 70 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अंतिम टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने 18,806 मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. येथील 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 70 जागांवर मतदान होणार आहे. यातील 9 जागा एससी आणि 17 जागा एसटीसाठी राखीव आहेत. 70 जागांच्या क्षेत्रात एकूण 1.63 कोटी मतदार असून त्यापैकी 81.42 लाख पुऊष मतदार आणि 81.72 लाख महिला मतदार आहेत, तर 684 तृतीयपंथीय मतदार आहेत. राज्यात दुसऱ्या टप्प्यात उत्तर आणि मध्य छत्तीसगडमध्ये मतदान होणार आहे. रायपूर पश्चिम विधानसभा जागेसाठी सर्वाधिक उमेदवार उभे राहिले आहेत. येथून 26 उमेदवार रिंगणात आहेत तर दौडी लोहारा येथे सर्वात कमी चार उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या टप्प्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांच्या जागेवर मतदान होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह 10 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांच्या जागेवरही शुक्रवारी मतदान होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन खासदारांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

Advertisement
Tags :

.