कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान साहित्य रवाना
332 मतदान केंद्रे, उद्या होणार मतदान
कणकवली / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 20 रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये मतदार संघातील 332 मतदान केंद्रांवर मंगळवारी येथील एचपीसीएल हॉल येथून साहित्य रवाना करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 2300 अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून हे साहित्य रवाना झाले.यामध्ये मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नितेश राणे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासहित अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी, संदेश परकर, गणेश माने व बहुजन समाज पक्षाचे चंद्रकांत जाधव हे रिंगणात आहेत.यात 1397 कर्मचारी, जवळपास 700 पोलीस व होमगार्ड, 107 राखीव कर्मचारी, 47 झोनल अधिकारी 62 मायक्रो ऑब्जरवर असे सुमारे 2300 कर्मचारी नियुक्त आहेत. मंगळवारी सकाळी 45 एसटी बस व 27 जीप गाड्यांच्या माध्यमातून हे साहित्य रवाना करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्यासहित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे, लक्ष्मण कसेकर सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, संतोष नागावकर, मेघनाथ पाटील यांच्यासहित इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री कातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बसेस रवाना करण्यात आल्या.