सावंतवाडी विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीने मतदान सुरू
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान सुरू आहे .सायंकाळी मतदान संपल्यानंतर निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे या संस्थेच्या निवडणुकीसाठी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुभाष नाईक ,मोहिनी रंजन गवस, मुकुंद मेस्त्री, लीलावती ज्ञानेश्वर जाधव अशा बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक प्रत्यक्षात दोन जागांसाठी होत आहे. परंतु ,खुल्या प्रवर्गासाठी सात जागा असल्यामुळे सात उमेदवार निवडून येणार आहेत. विद्यमान चेअरमन सुरेश केशव सावंत निवडणूक रिंगणात आहेत. गेली पंधरा वर्षे ते चेअरमन आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माझाही प्रयत्न होता परंतु गजा सावंत यांच्यामुळे ही निवडणूक लादली असल्याचा आरोप सुरेश सावंत यांनी केला. गजानन सावंत यांनी सांगितले की संस्थेची 35 वर्षे निवडणूक झाली नव्हती. गेली पंधरा वर्षे सुरेश सावंत चेअरमन आहेत . त्यांनी संस्थेच्या सभासदांचा विश्वासघात केला आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मी भाग घेतला. सुरेश सावंत यांच्यामुळे ही निवडणूक होत आहे. त्यामुळे संस्थेवर एक लाखाचा निवडणूक खर्चाचा भुर्दंड बसला आहे. असा आरोप गजा सावंत यांनी केला. यावेळी उबाठा सेनेचे चंद्रकांत कासार आबा सावंत गुणाजी गावडे तसेच संजय कानसे, गजा सावंत, जितु गावकर उपस्थित होते.