For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Zilla Parishad Election : राधानगरी तालुक्यात उत्साहात मतदान,सकाळी साडेदहा वाजेपर्यंत 15 टक्के मतदान

11:37 AM Feb 07, 2026 IST | NEETA POTDAR
zilla parishad election   राधानगरी तालुक्यात उत्साहात मतदान सकाळी साडेदहा वाजेपर्यंत 15 टक्के मतदान
Advertisement

                               राधानगरीतील २२३ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू

Advertisement

राधानगरी ( महेश तिरवडे ) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यात मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील २२३ मतदान केंद्रांवर सकाळपासून शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरू असून, सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरासरी २२ टक्के मतदान झाले आहे. मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने काही मतदान केंद्रांवर विशेष उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये राधानगरी कन्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या ‘पिंक मतदान केंद्रा’ला महिला मतदारांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे.

राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे —
राधानगरी मतदारसंघात ४९, राशिवडे बुद्रुक ४८, कसबा तारळे ४१, कसबा वाळवे ३९ तर सरवडे मतदारसंघात ४६ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पडावी यासाठी तालुक्यात एकूण ८९२ निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ओलवण, हसणे, डिगस, बागलवाडी, चाफोडी तर्फे ऐनघोल व वडाचीवाडी येथील मतदान केंद्रे ‘शॅडो एरिया’ (छाया क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी अनिता देशमुख यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.