धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनचे आज मतदान
उमरगा :
धाराशिव जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनसाठी शनिवारी जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. मजूर संस्थेचे कार्यालय व सात ठिकाणच्या सहाय्यक निबंधक केंद्र अशी मिळून आठ मतदान केंद्र आहेत.एकूण १३ पैकी चार जागा बिनविरोध निघाले आहेत. सध्या नऊ जागांसाठी २४ उमेदवार रंगात उतरले आहेत. महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. उमरगा येथील मतदान केंद्राबाहेर सकाळपासूनच विविध नेतेमंडळीची उपस्थिती दिसून आली. जिल्ह्यात 345 मतदार आहेत तर उमरगा तालुक्यात 50 मतदार आहेत.उमरगा सर्वसाधारण मतदारसंघात फेडरेशनचे माजी अध्यक्ष सिद्राम जाधव महायुतीकडून तर महाविकास आघाडीकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानाराव भोसले मैदानात आहेत. तर महिला प्रतिनिधी जागेसाठी महाविकास आघाडीकडून प्रियंका प्रकाश आष्टे व उमरगा तालुक्यातील अंबर नगरचे किसन जाधव हे विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघातून महायुतीकडून मैदानात आहेत.