For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात आज महापालिकांसाठी मतदान

06:57 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात आज महापालिकांसाठी मतदान
Advertisement

29 महानगरपलिकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : चोख पोलीसबंदोस्त

Advertisement

मुंबई / प्रतिनिधी

राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत असून लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीनंतर राज्यातील प्रमुख शहरातील मतदारांचा कौल कोणाला असणार हे महापालिका निवडणूकितुन स्पष्ट होणार असुन राज्यातील मुंबई , ठाणे, नवी मुंबई, कल्याण -डोंबिवली , पुणे, पिंपरी -चिंचवड ,नाशिक आणि नागपूर या प्रमुख महापालिका निवडणूकीत राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Advertisement

 निवडणूक यंत्रणा सज्ज

राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान पेंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण 15 हजार 908 इतके उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलीस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बफहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.

ईव्हीएम मशिनसोबत आता ‘पाडू’ मशीन

महापालिका निवडणुकीसाठी ईव्हिएम मशिनसोबत आणखीन एक मशिन लावणार आहे. अचानक हे मशीन लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. ईव्हीएम मशीनवऊन यापूर्वी मोठा गदारोळ झाला आहे. ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेण्यास विरोधकांचा विरोध आला. या वादामध्ये आणखी एक ठिणगी पडली. आता पालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनसोबत आणखी मशीन लावण्यात येणार आहे. मतमोजणीवेळी कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांना एकत्र जोडण्याचे आदेश आहेत. या प्रक्रियेत, जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणास्तव काम करू शकला नाही, तर पाडू नावाचे एक पर्यायी उपकरण वापरले जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येण़ार्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास  प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात ’पाडू‘ या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.