कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चार राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान

07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

23 जून रोजी मतमोजणी होणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

देशातील चार राज्यांमधील 5 विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. गुजरातमधील दोन जागांसह पंजाब, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. पाचही जागांवर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आता पोटनिवडणुकीचा निकाल 23 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमधील कालीगंज जागेवर सर्वाधिक 60.32 टक्के मतदान झाले होते. पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी 41.04 टक्के मतदानाची नोंद झाली होती. गुजरात आणि पंजाबमध्ये काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात तिरंगी लढत आहे. बंगालमध्ये काँग्रेस-डावे एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर केरळमध्ये ते एकमेकांविरुद्ध रिंगणात आहेत. केरळमध्ये मतदानादरम्यान युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) आणि लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) समर्थकांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article