Sangli Satara Election | सांगली-सातारा विधान परिषदेसाठी मतदानास सुरुवात; सांगलीत 'इतके' मतदार बजावणार हक्क
11:19 AM Jun 18, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
Advertisement
सांगली- सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत असून, भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. तर किशोर धुमाळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
सांगली-सातारा मतदारसंघात एकूण ८९५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यापैकी ४२३ मतदार हे सांगली जिल्ह्यातील आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाच ठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली असून, मतदारांकडून उत्साहात मतदान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Advertisement
Advertisement