For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापुरात पथनाट्याद्वारे मतदान जागृती

10:32 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापुरात पथनाट्याद्वारे मतदान जागृती
Advertisement

शहरासह तालुक्यातील ग्रामीण पथनाट्याचे सादरीकरण

Advertisement

खानापूर : येथील तालुका पंचायत आवारात तालुका स्वीप कमिटी व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी खानापूर शहरात मतदान जनजागृतीसाठी पथनाट्या सादर करण्यात आले. सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी वाद्ये वाजवून कार्यक्रमाची सुरुवात केली. तालुका स्वीप कमिटीच्या अध्यक्षा भाग्यश्री जहागीरदार यांनी या पथनाट्यात सहभागी होऊन मतदान करण्याबाबत आवाहन केले. तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण म्हणाले, मतदान जागृतीसाठी तालुक्यात नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवले आहेत. अजूनही मतदान जागृतीसाठी प्रयत्न करणार आहोत. मतदारानी आपल्या अधिकाराचा वापर करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत 69 टक्के मतदान झाले होते.  यावेळी 80 ते 90 टक्के मतदान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माध्यान्ह आहारचे अधिकारी महेश परीट, अश्पाक चांदनवर, श्रीशैल पॅटी, प्रल्हाद गुंडपीकर, महांतेश जंगटी, गणेश अलबादी, विजय बडिगेर, महांतेश तुरमरी व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. या पथनाट्या मंडळच्यावतीने खानापूर शहर, चापोली, गवाळी, पारवाड, चिखले, चोर्लासह विविध गावांमध्ये पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.