For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मतदान जागृती

06:13 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून  मतदान जागृती
Advertisement

स्वीप समितीचा उपक्रम

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून स्वीप समितीकडून मतदान जागृती करण्यात आली. या उपक्रमाला जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी क्रिकेट खेळून चालना दिली.

Advertisement

यावेळी ते म्हणाले, बेळगाव जिल्ह्यामध्ये मतदान जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये युवा मतदारांची नोंदणी अधिक झाली आहे. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन मतदान घेतले जात आहे. बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये स्वीप समितीकडून चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी जिल्हा पंचायत योजना निर्देशक डॉ. एम. कृष्णराजू, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, लेखाधिकारी गंगा हिरेमठ, ता. पं. कार्यकारी अधिकारी रामरेड्डी पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.