For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपातर्फे मतदान जनजागृती फेरी

10:04 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपातर्फे मतदान जनजागृती फेरी
Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी कॉलेज रोड, खडेबाजार, रविवारपेठ, कित्तूर चन्नम्मा सर्कल, सिव्हिल हॉस्पिटल रोड परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये भाग घेतला होता. सरदार्स मैदानापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे.  त्यामुळे देश बलवान होतो. तेंव्हा प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा.  ‘माझे मत, माझा हक्क’ अशा घोषणा देत ही रॅली काढली. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध भागांमध्ये जनजागृती फेरी काढण्यात येत आहे. ज्या भागामध्ये मतदानाचा टक्का कमी झाला आहे. त्या भागात प्रथम जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ही फेरी काढली जात आहे. या फेरीमध्ये महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.