For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ता. पं.तर्फे गावोगावी मतदान जागृती

10:34 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ता  पं तर्फे गावोगावी मतदान जागृती
Advertisement

महिनाभर विविध उपक्रम : सायकल रॅली, मॅरेथॉनचेही आयोजन : तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींमध्ये जागृती

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाबरोबर तालुका पंचायतीने कंबर कसली आहे. तालुका पंचायतीतर्फे गावोगावी मतदान जागृती केली जात आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अधिकारी रामरेड्डी पाटील यांनी दिली आहे. तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींमध्ये मतदान जागृती केली जात आहे. सायकल रॅली, रांगोळी, मॅरेथॉन आदी उपक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचले जात आहे. दरम्यान, मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. शिवाय भेटीदाखल वस्तू स्वीकारु नये, असे आवाहनही केले जात आहे. 4 मे पर्यंत महिनाभर जागृती मोहीम गावोगावी राबविली जात आहे. ग्राम पंचायत, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा कार्यकर्त्या आदींचा यामध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर व्यवहार वाढू लागला आहे. यासाठी मतदान जागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडताना लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले जात आहे. तालुक्यातील होनगा, काकती ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात शुक्रवारी सायकल रॅली आयोजित करून जागृती करण्यात आली. यामध्ये तालुका पंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. मतदान जागृती दरम्यान इव्हीएम मशिनचेही प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली जात आहे. तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात ही जागृती मोहीम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

4 मे पर्यंत मतदान जागृती

दि. 4 मे पर्यंत तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींमध्ये मतदान जागृती केली जाणार आहे. सायकल रॅली, रांगोळी, स्पर्धा, मॅरेथॉन आयोजित करून मतदारांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

- रामरेड्डी पाटील (कार्यकारी अधिकारी)

Advertisement
Advertisement
Tags :

.