For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंग्यानकोप्प येथे नरेगा कामाच्या ठिकाणी मतदान जनजागृती

10:22 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंग्यानकोप्प येथे नरेगा कामाच्या ठिकाणी मतदान जनजागृती
Advertisement

घागर-तांब्यावर मतदानाची तारीख लिहून वाटप

Advertisement

खानापूर : तालुका स्वीप समिती खानापूर व ग्रामपंचायत मंग्यानकोप्प यांच्या संयुक्त विद्यमाने मंग्यानकोप्प येथे नरेगा कार्यस्थळावर शनिवार दि. 6 रोजी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका स्वीप समितीच्या अध्यक्षा भाग्यश्री जहागिरदार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी त्यांनी नरेगा कामगारांना मतदान करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी त्या म्हणाल्या, प्रत्येक मतदाराने निर्भय होऊन मतदान करणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे. यासाठी 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी मजुरांना मतदानाची तारीख लिहून घागरींचे वाटप करण्यात आले.

मजुरांना घागर व तांब्या वाटप

Advertisement

उन्हाळा आणि मतदान जनजागृतीसाठी मजुरांना घागर व तांब्या त्यावर 7 मे रोजी ‘मतदान सक्तीचे’ असे लिहून वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्वांना मतदानाची शपथ देण्यात आली. ता. पं. नरेगाच्या सहाय्यक संचालिका रुपाली बडकुंद्री यांनी सांगितले की, उन्हाळा असल्याने कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची साठवणूक व्हावी यासाठी मतदानाचा दिवस लक्षात यावा यासाठी ग्रा. पं.कडून तांब्या व घागरीवर मतदानाची तारीख लिहून देण्यात आली आहे. प्रत्येकाने मतदान सक्तीने करावे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी राजू तलवार, सचिव संतोष थुक्कप्पनवर, तांत्रिक समन्वयक मुरगेश यक्कंची, आयईसी समन्वयक महांतेश जंगटी, तांत्रिक सहाय्यक महम्मद मुल्ला, बीएफटी शंकर इटगी, कर्मचारी, 226 मजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.