For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा येथे महाप्रसाद घेणाऱ्या भाविकांमध्ये मतदान जागृती

06:05 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा येथे महाप्रसाद घेणाऱ्या भाविकांमध्ये मतदान जागृती
Advertisement

हिंडलगा/ वार्ताहर

Advertisement

हनुमान जयंतीच्या महाप्रसादासाठी उपस्थित भाविकांना मतदान करण्यासंदर्भात जागृती करण्याचा उपक्रम यशस्वी केला. या महाप्रसादाला 3500 भाविक उपस्थित होते. दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

सुवर्णमहोत्सवी हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंडलगा येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते. हे औचित्य साधून गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना नाईक व अभिनव भोसले यांनी मतदान करण्यासंदर्भात जागृती करून पत्रके वाटली. पुऊष व महिला मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले गेले. केंद्र सरकार व राज्य सरकार याबाबत बरेच उपक्रम हाती घेऊन दूरदर्शन, वृत्तपत्र, विविध संस्था, सरकारी कर्मचारी, विविध कंपन्या, कॉलेजमधील विद्यार्थी, कंपन्यांच्या जाहिराती, बॅनर, क्रीन बोर्ड याद्वारे जागृती करून मतदानाचा टक्का वाढण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातीलच एक भाग समजून एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने महाप्रसादासाठी उपस्थित असलेल्या मतदारांना जागृत करण्यात आले. मतदानाचे महत्त्व पटवून दिले. भारतातील लोकशाही ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. यासाठी युवक व युवतींनी ही सुवर्णसंधी साधून मतदान जागृती केली. मतदान तुमचा हक्क व कर्तव्य आहे.  तुमचे मत म्हणजे देशाचे भविष्य आहे. मत विकण्याचा कदापि प्रयत्न करू नका, अशा पद्धतीने मतदान जागृती करण्यात आली. लोकसभा निवडणूक 2024 ही यशस्वी व्हायची असेल तर 100 टक्के मतदारांना मतदान करण्यासाठी जागृत करा व आपले अनमोल मत दान करून राष्ट्राभिमान वाढवा, अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबविला.

Advertisement

Advertisement
Tags :

.