For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृणाल हेब्बाळकर यांना मतदारांचा पाठिंबा

01:06 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृणाल हेब्बाळकर यांना मतदारांचा पाठिंबा
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना विश्वास : गोकाक येथे प्रचारसभा : मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद 

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मृणाल हेब्बाळकर यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात आहे. कोणताच भेदभाव न ठेवता सर्वानुमते पाठिंबा देण्यात येत आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. गोकाक येथे प्रचार करून पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी भेट देऊन मत देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रचारफेरी सुरू आहे. बहुतांश संघटनांची भेट घेऊन मत देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये प्रचारासाठी काम केले आहे. मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणारा प्रतिसाद यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. पक्षभेद विसरून सहकार्य करण्याचा विश्वास मतदारांनी दिला आहे. यावेळी भाजप पक्षाकडूनच त्यांच्या उमेदवाराला अंतर्गत विरोध आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले. मृणाल हेब्बाळकर यासाठी योग्य उमेदवार आहेत. गेल्या 11 वर्षांपासून ते समाजकार्यात कार्यरत आहेत. विकासाची निश्चित दिशा ठरवून कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रोजगार उपलब्ध करून देणे, महिला सबलीकरण, नवनवीन उद्योग-व्यवसायांना चालना देऊन मतदारसंघाचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशा उत्साही उमेदवाराला मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून द्यावे. बेरोजगारी, वाढलेली महागाई, विकास कामांकडे दुर्लक्ष, खोटी आश्वासने देऊन केलेली फसवणूक याची जाणिव ठेवून मतदारांनी भाजपला धडा शिकविला पाहिजे, असे आवाहनही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.