महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालवण येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

05:13 PM Nov 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अग्निशमन, घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सार्वत्रिक आणि प्रबुद्ध सहभागासाठी; निवडणुकीत माहितीपूर्ण आणि नैतिक पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रबोधन करून मतदारांना सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा. श्री. अनिल पाटील (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून मालवण नगरपरिषद क्षेत्रात मतदार जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, मालवण तहसीलदार श्रीम. वर्षा झाल्टे, निवासी नायब तहसिलदार श्री. गंगाराम कोकरे, पोलीस उप-निरीक्षक श्री. संदीप खाडे, वाहतूक नियंत्रण पोलिस श्री.गुरुप्रसाद परब, श्री. दादा वेंगुर्लेकर मातृत्व फाऊंडेशन यांच्यासह या मतदार जनजागृती मोहिमेत शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, युवा मतदार, महिला मतदार, व नागरिक सहभागी झाले होते. दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी २६९- कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने SVEEP(Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे या मतदान जनजागृती कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मतदार जनजागृतीसाठी अग्निशमन, घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात मालवण शहरातील देऊळवाडा नाका येथून झाली व पुढे एसटी स्टँड-भरडमार्गे बाजारपेठेतून फोवकांडा पिंपळ येथून पुढे नगरपरिषद येथे रॅलीची सांगता करण्यात आली. सदर रॅलीस शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व रॅली पाहण्यासाठी गर्दी केली. मोटारसायकल रॅली पूर्ण झाल्यानंतर सर्व उपस्थितांना मतदान शपथ देण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम, मतदार सेल्फी पॉईंट इत्यादी माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. मतदान जनजागृतीपर घोषणा, जनजागृतीपर गीते यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर व्यापून गेला. तसेच मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य, नगरवाचन मंदिर व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वकृत्व स्पर्धा, स्विमिंग स्पर्धा अश्या विविध स्पर्धासहित कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याचे मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले व सर्व मतदारांना 100% मतदान करण्याचे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केले

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # konkan update # news update # marathi news
Next Article