For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वचन पाळलेल्या काँग्रेसलाच मतदान करा

11:12 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
वचन पाळलेल्या काँग्रेसलाच मतदान करा
Advertisement

चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचे मतदारांना आवाहन

Advertisement

बेळगाव : गेल्या विधानसभा निडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाकडून दिलेले आश्वासन पाळण्यात आले आहे. बोले तैसा चाले, हे दाखवून देण्यात आले आहे. यासाठी काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून देण्यात यावे, असे आवाहन चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. रायबाग विधानसभा मतदार संघातील बेंडवाड येथे प्रचार करून आयोजित सभेमध्ये त्या बोलत होत्या. या भागातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा योजनांची गरज आहे. मात्र विद्यमान खासदारांकडून येथील जनतेच्या समस्या जाणून घेण्यात दुर्लक्ष केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदार संघातील नागरिकांच्या समस्येबाबत कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. मात्र यावेळी हे होवू देणार नाही. या भागातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या योजनांची पूर्तता केली जाईल. असे आश्वासन प्रियांका जारकीहोळी यांनी दिले. यासाठी मतदारांनी दि. 7 मे रोजी आपल्याला मतदानाच्या स्वरुपात आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

गोरगरिबांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न

Advertisement

राज्य सरकारकडून महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना राबवून आर्थिकरित्या सबल करण्यासाठी योजना जारी केली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी, महिलांना मोफत बस प्रवासासाठी शक्तीयोजना जारी करून, गोरगरिबांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न आहे. भविष्यामध्ये अशा विकासाभिमुख योजना राबवून सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी. या निवडणुकीत भरघोस मतदान करून आपल्याला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदार संघामध्ये प्रचारादरम्यान महिला संघटनांकडून औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले. या दरम्यान महिला संघटना, युवा संघटनांकडून भरघोस पाठिंबा देण्यात आला. चिकोडी ब्लॉक अध्यक्ष निर्मला पाटील, रियाज नदाफ, सिद्धराम पुजेरी, अशोक जगन्नाथ, विनोबा बोळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.